घाटंजी : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात तीन महिलांसह एकूण २८ जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून पोलीस उपनिरीक्षक विलास सिडाम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीरज कुंभारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय कडू, माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे, राम खांडरे, शिक्षण विस्तार अधिकारी नारायण भोयर, राकाँ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वामन नवनाथ, वंचित बहुजन आघाडीचे संघपाल कांबळे, डॉ. भाऊ बन्सोड आदी उपस्थित होते. संचालन भाविक भगत, प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विठ्ठलराव कांबळे यांनी तर आभार ग्रामीण रुग्णालयाचे सुनील जगताप यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी रितेश बोबडे, डॉ. विजय कडू, अरुण कांबळे, बोबडे मित्र परिवाराचे शिवम ठाकरे, प्रणव भारती, भाविक भगत, अक्षय डुकरे, जीवन राठोड, विश्वास निकम, श्रीकांत राठोड, विराज निवल, दत्ता कांबळे, सूरज मोतेवार, अभिषेक शहाडे, नीळकंठ गिनगुले, ब्लड बँकेचे वैद्यकीय अधीक्षक आशिष दहापुते, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली जक्कूलवार, केशीराज मांडेकर, प्रदीप वाघमारे, गजानन गेडाम, निलेश खंडाळकर, आदर्श खडक्कर, सुरेश सुरोसे, महेंद्र देवतळे, प्रदीप वाकपैजन, सुधाकर अक्कलवार आदींचे सहकार्य लाभले. यावेळी रक्तदान करताना व प्रमाणपत्र स्वीकारताना अनेकानी छाायाचित्र काढून घेतले.
बॉक्स
‘लोकमत’ रक्तदान मोहिमेत आजचे रक्तदाते
लिना नरेश लांजेवार, मनीषा महेंद्र देवतळे, मंजुषा देवानंद पाटील, श्रीकांत पायताडे, राम खांडरे, श्रीकांत राठोड, वसंत महादेव सिडाम, शिवम ठाकरे, अभिषेक शहाडे, श्रीकांत आत्राम, अनिकेत पुरुषोत्तम जीवतोडे, पवन चंद्रकांत राऊत, नागेश विरदंडे, शुभम प्रदीप भगत, चेतन सदाशिव डंभारे, अभिषेक प्रफुल चौधरी, शुभम श्याम खांडरे, प्रणव संजय भारती, गणेश राजू पवार, विश्वास सोपानराव निकम, विरज विठ्ठल निवल, देवानंद सीताराम गायकवाड, खुशाल गोविंद पडवे, सचिन गजानन आणेवार, राहूल बंडूजी पेटेवार, ऋषीकेश चिंतामण मेश्राम, प्रफुल शिवदास लाकडे, रितेश रंजीत बोबडे.