लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जीएसटीच्या जाचक अटी रद्द कराव्या, जीएसटी कायद्यात रोज नवनवीन दुरुस्त्या होतात यामुळे व्यापारी वर्ग हा त्रस्त आहे, सुटटसुटीत करप्रणाली आणावी, मालाचे उत्पादन करणाऱयांवर एक रकमी कर लावावा अश्या अन्य विविध मागण्यांसाठी व्यापाऱयांनी शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून शासनाचा निषेध व्यक्त केला. व्यापाऱ्याच्या या बंदला संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्यापाऱ्याच्या मागणीत सर्वात मुख्य मुद्दा की व्यापाऱ्याना रिटर्न भरण्याची संधीच नाही. मानवी चुकांमुळे चुकून भरलेल्या रिटर्न मध्ये काही त्रुटी राहिली तर व्यापाऱ्याना दंड भरावा लागतो .या जाचक अटीमुळे व्यापारी, चार्टड अकौंटंटमध्ये सर्वात जास्त रोष व्याप्त आहे. सरकाराने यावर लवकरात लवकर पावले उचलावी अशी मागणी व्यापारी करत आहे