विडूळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच दिवसात तब्बल ४२० लाभार्थ्यांनी लस घेत उच्चांक गाठला. लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आरोग्य केंद्रात शनिवारी लसीकरण शिबिर घेण्यात आले. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. ४२० लाभार्थ्यांनी लस घेतली. आरोग्य केंद्राला दिवसभर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेवक किशोर एडके, व्ही.के. चव्हाण, दादा नरोले, ताई राणे, ताई मुनेश्वर, धुरपताबाई, रमेश बलखंडे, पी.एल. जाधव आदी आरोग्य कर्मचा-यांसह पोलीस पाटील गजानन मुलंगे, मंडळ अधिकारी मिलिंद घट्टे, मारुती कोतेवार, गजानन रणमले, अंकुश लामटीले, तुकाराम पोहुकर, विजय पोहुकर, नीलेश बोनसले, अमृता बनसोड, धर्मा कांबळे आदींनी सहकार्य केले.
040721\img_20210703_115228.jpg
विडूळ येथे कोविड लसीकरणासाठी उस्फुर्त प्रतिसाद