लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पुसद लगतच्या वालतुर रेल्वे येथील प्रयोगशील शेतकरी गजानन जामगडे यांनी कल्पकतेचा वापर फवारणी यंत्र तयार केले आहे. या व्दारे हरभरा या छोट्या पिकावर तसेच तुरीसारख्या वाढणाऱ्या पिकांवर देखील योग्यरीत्या फवारणी करता येते. मजूर टंचाईच्या काळात कमी कालावधीत व कमी खर्चात योग्यरित्या ते या यंत्राच्या साहाय्याने फवारणी करीत आहे . गेल्या दोन वर्षांपूर्वी फवारणी करताना विषबाधा होऊन जिल्ह्यात २२ शेतकऱ्यांंचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. गेल्यावर्षी जवळपास २५० शेतकऱ्यांना फवारणी करताना विषबाधा झाली होती फवारणी करताना विषबाधा टाळून या यंत्राव्दारे करण्यात येणारी फवारणी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात घरगुती सामानातून शेतकऱ्याने बनविले फवारणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 2:44 PM