यवतमाळ : फवारणीच्या औषधाने मृत्युमुखी पडणाºयांची संख्या दिवसेंन्दिवस वाढत असूनही सरकार गंभीर नाही. दिवाळीपर्यंत शेतकरी आणि शेतमजुरांना न्याय न मिळाल्यास कृषिमंत्र्यांच्या मुंबई निवासस्थानात घुसून फवारणी करू, असा इशारा अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला.सोमवारी यवतमाळात प्रहार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा झाला. या मेळाव्यासाठी बच्चू कडू आले असता त्यांनी जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणावर आवाज उठविला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन सादर केले. फवारणीतील बाधित शेतकरी-शेतमजुरांना बळीराजा चेतना अभियानातून दहा हजारांची मदत देण्याची मागणी कडू यांनी केली. मोर्चाला संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, विदर्भातले मुख्यमंत्री, कृषीमंत्री व पालकमंत्री असतानाही शेतकºयांच्या प्रश्नावर सरकारला सोयरसुतक दिसत नाही.शेतकरी, शेतमजुरांना केवळ दोन लाखांची मदत आहे. औषधी कंपन्या, विक्रेते आणि अधिकाºयांवर फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारला दिवाळीपर्यंत अवधी देऊ. यानंतरही न्याय न मिळाल्यास कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या मुंबई येथील निवासस्थानात घुसून फवारणी करू. यात किटकनाशक राहणार नाही. पण सरकारची बुद्धी ताळ्यावर येईल असेच काही असेल, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
कृषिमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 10:07 PM
फवारणीच्या औषधाने मृत्युमुखी पडणाºयांची संख्या दिवसेंन्दिवस वाढत असूनही सरकार गंभीर नाही.
ठळक मुद्देबच्चू कडूंचा इशारा: विषबाधाप्रकरणी ‘प्रहार’चा धडक मोर्चा