शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

वसंतच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्याचा नातूही रिंगणात

By admin | Published: March 26, 2016 2:22 AM

वसंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा नातू ...

२४६ अर्ज : विद्यमान आमदारासह चार माजी आमदारांचे नामांकनअविनाश खंदारे उमरखेडवसंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा नातू राज जय नाईक यानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. तर एका विद्यमान आमदारासह चार माजी आमदार रिंंगणात असून २४६ उमेदवारांनी निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे. माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाने निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय समीकरणे बदलत आहे. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या १९ संचालकांसाठी निवडणूक होत आहे. २३ मार्च या नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २४६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे आजी-माजी आमदार निवडणूक रिंगणात उतरले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे सुपूत्र जय नाईक यांचे चिरंजीव राज नाईक यांनीही या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले आहे. त्यांनी आपला अर्ज पुसद गट व विमुक्त भटक्या जाती जमाती मतदारसंघातून दाखल केला आहे. अ‍ॅड.निलय नाईक यांनी वसंतचे उपाध्यक्षपद भूषविले होते. परंतु त्यानंतर नाईक घराण्याचा कुणीही वसंत साखर कारखान्यावर संचालक किंवा पदाधिकारी म्हणून आला नाही. कारखाना डबघाईस आला असताना या निवडणुकीत रंगत राहणार नाही, असा अंदाज होता. परंतु २३ मार्च रोजी राज नाईक यांनी आपले नामांकन दाखल केले आणि सर्व राजकीय समीकरणेच बदलली आहे. नाईक घराण्याचे वारसदार पुन्हा या कारखान्यात येण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी आपली मते व त्यांना मानणारा गट कोणाला घेवून बसणार हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे. या निवडणुकीत ऊस उत्पादक गट पुसदमध्ये २८, उमरखेड ३५, ढाणकी ३१, महागाव २३, हदगाव ४७, सहकारी संस्था मतदारसंघात १५, अनुसूचित जमाती सात, महिला राखीव २९, इतर मागास प्रवर्ग १७, भटक्या विमुक्त जाती १४ असे २४६ जणांनी नामांकन दाखल केले आहे. १२ एप्रिलपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत असून त्यानंतरच या निवडणुकीचे स्पष्ट होईल.अनेक दिग्गज आमने-सामने या निवडणुकीत अनेक दिग्गजांनी नामांकन दाखल केले असून हदगावचे शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर, माजी आमदार बापुराव पाटील आष्टीकर, प्रकाश पाटील देवसरकर, माधवराव पाटील यांच्यासह जेठमलजी माहेश्वरी यांचे नातू नितीन माहेश्वरी, अजय माहेश्वरी, अनिल कदम यांनी नामांकन दाखल केले आहे. तसेच बाजार समितीचे सभापती कृष्णा पाटील देवसरकर, युवराज देवसरकर, विजय जैन, अ‍ॅड.माधवराव माने, चितांगराव कदम, शामराव सुरोशे, शंकरराव तालनकर, स्मिता कदम यांनी उमेदवारी दाखल केली आहे.