शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

एसटी बस वाहकच निघाला दारू तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:19 PM

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बस ही यासाठी हक्काचे वाहन झाले आहे. चंद्रपूर आगाराच्या वाहकालाच दारू तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली.

ठळक मुद्देचंद्रपूर डेपोची बस : पांढरकवडा बायपासवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करीत अनेक हात गुंतले आहेत. एसटी बस ही यासाठी हक्काचे वाहन झाले आहे. चंद्रपूर आगाराच्या वाहकालाच दारू तस्करी करताना रंगेहात अटक करण्यात आली. परिवहन विभागातील सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याने गोपनीय माहितीवरून शुक्रवारी दुपारी येथील पांढरकवडा बायपासवर ही कारवाई केली.अमरावती-चंद्रपूर ही बस यवतमाळ बसस्थानकावर आली. यवतमाळातून चंद्रपूरला दारू जात असल्याची गोपनीय माहिती सुरक्षा व दक्षता अधिकाºयाला मिळाली. चंद्रपूर बस शहराबाहेर निघताच दबा धरून असलेल्या सुरक्षा अधिकारी जयंत कांडलकर यांनी पाढंरकवडा बायपासवर बस थांबविली. सुरक्षा पथकाने फक्त वाहक गणेश शंकरराव बन्सोड (बिल्ला क्रं. ३४४०) याच्या पेटीची झडती घेतली. त्याच्या पेटीमध्ये विदेशी मद्याच्या चार बॉटल्स आढळून आल्या. हा वाहक अनेक दिवसांपासून प्रत्येक फेरीत चंद्रपूरला दारू पोहोचविण्याचे काम करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी वाहकाविरूद्ध दारूबंदी कायदानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच चालक विजय धुमाळ यांचा जबाब घेतला. ही कारवाई सुरक्षा व दक्षता पथकातील निरीक्षक दिलीप लोखंडे, सहायक निरीक्षक गणेश केरबा कदम, राजेश गणपत बन्सोड यांनी केली. या कारवाईमुळे एसटी कर्मचारी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी