लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रवासी वाहतुकीला धोका निर्माण होण्यासोबतच कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत ‘एसटी’ने एस.के. ट्रान्सलाईन्सचा कुरिअर परवाना रद्द केला आहे. ही सेवा आता महामंडळाकडून पुरविली जात आहे.‘एसटी’ महामंडळाने परवाना पध्दतीने कुरिअर सेवा सुरू केली आहे. यासाठी जळगाव येथील मे.एस. के. ट्रान्सलाईन्स प्रा.लि.सोबत १ नोव्हेंबर २०१५ ते ३१ नोव्हेंबर २०१८ या कालावधीसाठी करार केला होता. मात्र करारातील तरतुदीचे पालन या कंपनीकडून केले जात नव्हते. असमाधानकारक काम असल्याने महामंडळाच्या प्रवासी वाहतुकीला धोका निर्माण झाल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले. शासकीय नियमांचा भंग सातत्याने होत असल्याने कायदेशीर पेच निर्माण होऊन महामंडळाच्या लौकीकास बाधा पोहोचत असल्याची बाबही पुढे आली.नागरिकांच्याही अनेक तक्रारी या कंपनीविषयी झाल्या आहेत. जादा दर आकारले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे महामंडळाने या कंपनीचा परवाना १८ डिसेंबरपासून रद्द केला आहे. सोबतच करारातील तरतुदीनुसार सुरक्षा रक्कम एक कोटी १२ लाख ५० हजार रुपये आणि बँक गॅरंटी दोन कोटी रुपये जप्त करण्यात आली आहे. आर्थिक बाबी संदर्भातील आणखी कारवाई या कंपनीवर केली जाणार आहे. महामंडळाच्या सर्व बसस्थानकावर पार्सल कुरिअर कार्यालय तातडीने कार्यान्वित करण्याचे करारात नमूद करण्यात आले आहे. तरीही ही कार्यालये सुरू करण्यात आलेली नाही. महामंडळाने वारंवार सूचना देऊनही उपयोग झाला नाही. या प्रकारात प्रवाशांची गैरसोय झाल्याचेही महामंडळाने म्हटले आहे.दरपत्रक अखेरपर्यंत मिळाले नाही‘एसटी’ कुरिअरकडून मनमानी दर आकारले गेले. लोकांची आर्थिक लूट करण्यात आली. हा प्रश्न यवतमाळ येथील ललित रानुलाल जैन यांनी लाऊन धरला. ० ते १०० ग्रॅम वजनासाठी किती दर निश्चित केले याची माहिती महामंडळाला फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी मागितली होती. यावर महामंडळाने एस.के. ट्रान्सलाईन्सला पत्र पाठवून जैन यांना दरपत्रक पाठविण्यात यावे, असे सूचविले. परंतु अजूनही त्यांना दरपत्रक प्राप्त झाले नाही. आता परवाना रद्द करण्यात आला. त्यामुळे दरपत्रक मिळणार की, नाही हे महामंडळाने स्पष्ट करावे, असे जैन यांनी ‘एसटी’च्या महाव्यवस्थापकांना २० डिसेंबर रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.वस्तू आणि सेवाकर चुकविलाजुलै २०१७ पासून या कंपनीने एसटी महामंडळाकडे वस्तू आणि सेवाकराचा भरणा केला नाही. दरमहा सेवाकर १८ लाख ७५ हजार रुपये होतो. सहा महिन्याची सेवाकराची एकूण रक्कम एक कोटी १२ लाख ५० हजार रुपये होते. पार्सल करार रद्द करण्यासाठी हे कारणही महामंडळाने सांगितले आहे.
‘एसटी’ कुरिअरचा पार्सल परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 10:05 PM
प्रवासी वाहतुकीला धोका निर्माण होण्यासोबतच कराराचा भंग केल्याचा ठपका ठेवत ‘एसटी’ने एस.के. ट्रान्सलाईन्सचा कुरिअर परवाना रद्द केला आहे. ही सेवा आता महामंडळाकडून पुरविली जात आहे.
ठळक मुद्देपुन्हा महामंडळाकडे : एसके ट्रान्सलाईन्सला चपराक