शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

एसटी झाली पंक्चर; खासगी वाहतूकदारांची दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु केलेेल्या बेमुदत उपोषणाने एसटीची चाके थांबली ...

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर सुरु केलेेल्या बेमुदत उपोषणाने एसटीची चाके थांबली आहेत. जिल्ह्यातील नऊही आगारांमध्ये परिवहन महामंडळाचे कर्मचारी गुरुवारी कामावर न आल्याने ३४३ बसफेऱ्या दिवसभरात रद्द झाल्या. यातून  महामंडळाचे १७ लाखांचे उत्पन्न बुडाले.  प्रवाशांनाही विविध अडचणीचा सामना करावा लागला. याचा नेमका फायदा खासगी वाहनचालकांना उचलला.राज्य परिवहन महामंडळाच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसले आहेत. बुधवारी जिल्हास्तरावर हे उपोषण होते. गुरुवारी आगारस्तरावर उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले.  या आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाचे ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले. यामुळे एसटीची चाके थांबली. परिवहन महामंडळाच्या २६३१ कर्मचाऱ्यांपैकी १९०३ कर्मचाऱ्यांनी  आंदोलनात सहभाग घेतला.   नऊ  आगारांपैकी यवतमाळ आणि वणी आगारात ११ पर्यंत वाहतूक सुरू होते. यानंतर सर्वच ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. परिवहन महामंडळ विविध मार्गांवर ४३० फेऱ्या करते. यातील ३४२ फेऱ्या दिवसभरात रद्द झाल्या. ५८ हजार किलोमीटरचा प्रवास आंदोलनामुळे ब्रेक झाला. दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने सुटयामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या गाडयाच आल्या नाहीत. यामुळे प्रवाशांना अचानक आपला प्रवास रद्द करावा लागला. अनेकांंची वेळेवर धावपळ झाली. त्यांना अधिक दरात खासगीने प्रवास करावा लागला. 

जिल्ह्यात वणी आगारातून ६ आणि यवतमाळ आगारातून २५ बसफेऱ्या झाल्या. दुपारनंतर संपूर्ण ऑपरेशन थांबलेेलेे होते. एकूणच वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. राळेगाव, वणी आणि पांढरकवडा आगाराला भेटी दिल्या.- श्रीनिवास जोशीविभाग नियंत्रक, यवतमाळ

नऊ आगारांत प्रशासन अधिकाऱ्यांच्या भेटी- उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यासाठी एसटीच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. मात्र, आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम होते, तर दुसरीकडे तोडगा काढण्यासाठी बैठकाही सुरूच होत्या.

अशा आहेत रद्द   झालेल्या फेऱ्या- नऊ आगारातून ३४२ फेऱ्या रद्द झाल्या. यामध्ये यवतमाळ २३, पुसद ५९,, वणी ४५, उमरखेड ३२, दारव्हा ५०, पांढरकवडा ४५, नेर २९, दिग्रस ३१ तर राळेगाव मधील २८ फेऱ्या दिवसभरात रद्द    झाल्या. 

 

टॅग्स :state transportएसटीagitationआंदोलन