शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

डिझेल संपल्याने एसटी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:22 PM

आवश्यक तेवढ्या डिझेलची तरतूद न केल्याने मंगळवारी ‘एसटी’वर बसफेऱ्या रद्दची नामुष्की ओढवली. यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शिवाय दहा ते बारा हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसानही झाले.

ठळक मुद्देविभागात ठणठणाट : प्रवाशांचे हाल, आर्थिक टंचाईचा मार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आवश्यक तेवढ्या डिझेलची तरतूद न केल्याने मंगळवारी ‘एसटी’वर बसफेऱ्या रद्दची नामुष्की ओढवली. यात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. शिवाय दहा ते बारा हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसानही झाले. आर्थिक टंचाईमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात नऊ आगार आहेत. यातील यवतमाळसह वणी, पांढरकवडा या मोठ्या आगारांनाही डिझेल तुटवड्याचा फटका बसला. वणीची गरज नेर आगारातून डिझेल नेऊन भागविण्यात आली, तर पांढरकवडा आगाराला दुपारी डिझेल पोहोचले. यवतमाळ आगाराला संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.आगारातील आणि बाहेरून येणाºया बसेसमध्ये डिझेल भरण्याची सोय आगारामध्ये करण्यात आलेली आहे. भरपूर क्षमतेच्या डिझेल टँक आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे या टँक अपवादानेच पूर्ण भरल्या जात आहे. केवळ दोन ते तीन दिवसांचाच साठा केला जातो. ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास फेºया रद्द केल्या जातात. असाच प्रकार मंगळवारी घडला. जिल्ह्यातील बहुतांश आगारातील टँकमध्ये डिझेल नव्हते.यवतमाळ आगाराला दररोज किमान सहा हजार लिटर डिझेलची आवश्यकता आहे. मात्र येथे केवळ दोन दिवसांची सोय करण्यात येते. १२ हजार लिटर डिझेल बोलाविले जाते. किमान २० हजार लिटर डिझेलचा साठा असल्यास चार दिवसांची सोय होते. या आगाराची डिझेल साठवण क्षमता ३४ हजार लिटरची आहे. तरीही साठवण करण्यात हात आखडता घेतला जात आहे. महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ