शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 5:00 AM

राज्य परिवहन महामंडळांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ३० जून २०१८ च्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात यावी, घरभाडे भत्ता मिळावा, उत्सव अग्रीम दोन वर्षांपासून कमी करण्यात आला आहे. ही बाब कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. यातूनच विभागीय कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू झाले. या आंदोलनाचा एक भाग म्हणून गुरुवारपासून एसटीचे कर्मचारी आंदोलन तीव्र करणार आहेत. जिल्हास्तरावर असलेले हे आंदोलन प्रत्येक आगारात होणार आहे. यामुळे वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिनाभर काम करूनही वेतन वेळेवर दिले जात नाही. यामुळे एसटीचे कर्मचारी अडचणीत आले आहेत. कामगार करारानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दिलेले फायदे वेळेवर मिळत नाहीत. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. ३० जून २०१८ च्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात यावी, घरभाडे भत्ता मिळावा, उत्सव अग्रीम दोन वर्षांपासून कमी करण्यात आला आहे. ही बाब कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या २६ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. ३०६ कर्मचाऱ्यांना कोरोना काळात जीव गमवावा लागला. यानंतरही कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. यानंतरही हक्काची देयके मिळाली नाहीत, यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. मागण्या पूर्ण न झाल्यास गुरुवारपासून एसटी कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत. यामुळे  एसटीची चाके थांबणार आहेत. याचा फटका प्रवासी वाहतुकीला बसणार आहे. या आंदोलनात सदाशिव शिवणकर, संजय जिरापुरे, स्वप्निल तगडपल्लेवार, रवींद्र सातपुते, राहुल धार्मिक, पंकज लांडगे, प्रकाश बहाड, अभिजित बुटे, सुरेश कनाके, सुशांत इंगळे, ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत गावंडे, अमोल ठाकूर, अशोक कुमकर, समाधान सोंडकर, उमेश चव्हाण, निखिल दौलतकार, राजू सुतार, राजू मिरासे, प्रवीण बोकडे, यशवंत कडू, माधव पराते, गणेश बेंद्रे, प्रवीण बोनगीनवार, जितेंद्र पाटील, अविनाश भांडवलकर, ममता राम, निमसरकर, पोलादे यांच्यासह मोठ्यासंख्येने एसटीचे कर्मचारी सहभागी झाले होते.  

एसटीच्या प्रवासाला कुठलाही धक्का पोहोचू नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आंदोलनात नसलेले कर्मचारी परिवहन महामंडळ या काळात प्रवासी वाहतुकीसाठी वापरणार आहे. यामुळे आंदोलनाचा कुठलाही परिणाम वाहतुकीवर होणार नाही. जनसामान्यांना नियोजित स्थळी पोहोचविण्याचे काम एसटी करणार आहे.               

- प्रताप राठोडविभाग वाहतूक अधिकारी

 

टॅग्स :state transportएसटीagitationआंदोलन