शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

उमरखेड येथे मराठा साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ

By admin | Published: January 17, 2015 11:06 PM

श्रोत्यांनी खचाखच भरलेली साहित्य नगरी. मुद्रित भाषण सोडून थेट श्रोत्यांशी संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी साधलेला संवाद.

विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (उमरखेड) : श्रोत्यांनी खचाखच भरलेली साहित्य नगरी. मुद्रित भाषण सोडून थेट श्रोत्यांशी संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव यांनी साधलेला संवाद. कवितांची पेरणी आणि त्यातच बाप या कवितेने इंद्रजित भालेराव यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. निमित्त होतं दहाव्या राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाचं. उमरखेड येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात उभारण्यात आलेल्या विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरीत संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष इंद्रजित भालेराव टाळ्यांच्या कडकडाटात भाषणासाठी उभे झाले. कवी मनाच्या आणि शेतकऱ्यांची दु:खे अगदी जवळून अनुभवणाऱ्या या कवीने साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण वाचून दाखविण्याच्या परंपरेला फाटा दिला. माझे भाषण तुम्ही वाचले असेल असे म्हणत मी लेखी भाषण सांगणार नाही. इथे मुलही उपस्थित आहेत. मी त्यांच्यासाठी कविता म्हणणार, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. जिजाऊंच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मी लेखन केले आहे. माझे साहित्य भावनेच्या मापदंडात तोलू नका, असे सांगत भालेराव म्हणाले, जिजाऊच्या बालपणाची कविता लिहिणे खूप अवघड गोष्ट होती. पोरांनो परीक्षा आली की, टेन्शन येते. टेन्शन आले की मी पोटभर जेवतो, खूप झोपतो, त्यावेळी मला स्वप्न पडतात. त्या स्वप्नात जिजाऊ आल्या आणि मी त्यांच्या बालपणावर कविता करू शकलो. ‘जिजाऊ शिकते... एकुलती एक’ ही कविता स्वत: म्हणत प्रेक्षकांकडूनही म्हणवून घेतली. ‘जिथे राबतो तो माझा शेतकरी बाप’ ही कविता भालेराव यांनी गाऊन सादर केली. तेव्हा संपूर्ण श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. आपल्या कवितेतून शेतकऱ्यांचे वास्तव मांडणारे भालेराव म्हणाले, शेतकरी म्हणजे मराठा नाही जो शेतकरी तो मराठा, असे म्हणत शेतकऱ्यांच्या दु:खातच सामाजिक भूमिका दडली असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणाने संपूर्ण सभागृहाला चिंतनासोबतच हास्यात बुडविले.