लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी एमआयडीसीतील पॉर्इंट २४ तास खुले ठेवण्याचे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, माजिप्राचे कार्यकारी अभियंता अजय बेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांडगे, मुख्याधिकारी अनिल अढागळे, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता चितळे उपस्थित होते.यवतमाळ शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली असून ही पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. टंचाईच्या अनेक योजनांसोबत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. सध्या नगरपरिषदेच्या टँकरला एमआयडीसीतून पाणीपुरवठा होत आहे. मात्र या ठिकाणी गर्दी होत असल्याने टँकर भरण्यास अडचण निर्माण होते. जनतेला पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे आता एमआयडीसीतील पॉर्इंट टँकरसाठी २४ तास खुले राहणार असून त्यासाठी वेळापत्रक आखून देण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्याची भिस्त टँकरवरच असल्याने अतिरिक्त टँकरची डिमांड मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे तातडीने करण्याचे निर्देश दिले आहे. पावसाळ्यानंतरही निळोणा आणि चापडोह प्रकल्प पूर्ण भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही. त्यामुळे शहरानजीकच्या ग्रामीण भागातील जलस्रोत शोधण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यावरून किन्ही, भोसा, डोळंबा येथे पाण्याचे स्रोत असून याबाबत संबंधितांची बैठक सोमवारी घेणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.पाण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकआपत्तीच्या काळात हेल्पलाईन महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नगरपरिषदेने तत्काळ हेल्पलाईन सुरू करून क्रमांकाची प्रसिद्धी करावी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक तातडीने सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. शहरातील मागास भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा करण्याचे निर्देशही पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले.
एमआयडीसीतील पॉर्इंट टँकरसाठी २४ तास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 10:24 PM
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरसाठी एमआयडीसीतील पॉर्इंट २४ तास खुले ठेवण्याचे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आदेश : पाणीटंचाई निवारणासाठी बैठक