शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

स्टेट बँक खातेदारांचेदस्तावेज पोस्ट मैदानात बेवारस फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:00 AM

स्टेट बँकेच्या फायनान्सीअल इन्क्ल्यूजन अकाऊंट ओपनिंग फॉर्म त्यावर ग्राहकाचे रंगीत फोटो, आधार कार्ड व इतर अनेक महत्त्वाचे मूळ दस्ताऐवज लावलेले होते. बहुतांश फॉर्म हे दिग्रस तालुक्यातील ग्राहकांचे होते. किशोर भेंडे या एजंटकडून हे फॉर्म गोळा करण्यात आले असावे, असे त्यावरील सही, शिक्क्यावरून स्पष्ट होते. जवळपास शंभरच्यावर फॉर्म बेवारस फेकून देण्यात आले होते. या फॉर्मवर महिलांचे फोटो लागलेले होते.

ठळक मुद्देबँक एजंटचा प्रताप । नागरिकांच्या सतर्कतेने शहर पोलिसांच्या स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वसाधारण कुटुंबातील नागरिकांचे बँक खाते उघडण्याचे फॉर्म मूळ कागदपत्रासह यवतमाळातील पोस्टल मैदानावर बेवारस पडलेले आढळले. हा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याने बेजबाबदारपणे खाते उघडण्याचे फॉर्म त्याला लागलेल्या मूळ कागदपत्रांसह फेकून दिले. सूज्ञ नागरिकांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी हे कागदपत्र ताब्यात घेतले.स्टेट बँकेच्या फायनान्सीअल इन्क्ल्यूजन अकाऊंट ओपनिंग फॉर्म त्यावर ग्राहकाचे रंगीत फोटो, आधार कार्ड व इतर अनेक महत्त्वाचे मूळ दस्ताऐवज लावलेले होते. बहुतांश फॉर्म हे दिग्रस तालुक्यातील ग्राहकांचे होते. किशोर भेंडे या एजंटकडून हे फॉर्म गोळा करण्यात आले असावे, असे त्यावरील सही, शिक्क्यावरून स्पष्ट होते. जवळपास शंभरच्यावर फॉर्म बेवारस फेकून देण्यात आले होते. या फॉर्मवर महिलांचे फोटो लागलेले होते.त्यांचे आधार कार्ड व इतर महत्त्वाचे दस्ताऐवज त्याला जोडले होते. या सर्व दस्ताऐवजांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता होती. ज्या एजंटने हे फॉर्म खाते उघडण्यासाठी घेतले त्या एजंटने ते फॉर्म बँकेत जमाच केले नसल्याचे दिसून येते.त्यांचे हे फॉर्म मूळ दस्ताऐवजासह बेवारस पडून असल्याचे सांगितले असता त्यांनीही चिंता व्यक्त केली. संबंधित एजंटवर कारवाई होणे अपेक्षित आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यातील उपनिरिक्षकांनी घटनास्थळी भेट दिली.कागदपत्राचा गैरवापर होऊन फसवणुकीचा धोकाबँक खात्याशी संबंधित इत्यंभूत माहिती असलेले दस्तावेज बेवारस फेकून दिले. स्टेट बँके सारख्या जबाबदार बँकेच्या एजंटकडून हा गंभीर प्रकार घडला. यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीचा धोका वाढला आहे. सध्याच्या काळात आॅनलाईन फसवणुकीचे गुन्हे सतत वाढत आहे. एक साधा ओटीपी बँकेच्या खात्यातील पैशावर डल्ला टाकण्यासाठी पुरेसा आहे. पोस्टल मैदानावर आढळलेल्या बँक खात्याच्या फॉर्मसोबत ग्राहकाचे सर्वच डिटेल्स जोडलेले कागदपत्र होते. एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हाती हे दस्तावेज लागले असते तर त्या सामान्य ग्राहकांच्या खात्यातील रक्कम धोक्यात आली असती. अशा स्थितीत बँक ग्राहकाला संरक्षण देण्याऐवजी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे.बँक खाते उघडण्यासाठी एजंटकडे दस्तावेज व फोटो दिले होते. आता आमचे बँक खाते उघडले असून व्यवहारही सुरू आहे. कागदपत्र बेवारस फेकल्याबाबत माहिती नाही. असे झाले असेल तर ही फार गंभीर बाब आहे.- मनोज गावंडे, ता. तुपटाकळी ता. दिग्रस (एसबीआयचे ग्राहक)

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया