महसूल विभागाचा कणा असलेल्या राज्यातील कोतवालांच्या अनेक समस्या आहेत. यात कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करा, दरवर्षी वेतन वाढ द्या, नोकरीत बढती द्या, बढतीत ५० टक्के आरक्षण द्या, सेवानिवृतीनंतर कोणताही आर्थिक लाभ मिळत नसल्याने आर्थिक लाभ द्या, आदी मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी राज्यभर कोतवाल संघटना लढा देत आहे. यासंदर्भात राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांचे निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. राज्यातील कोतवालांच्या समस्या सोडविण्यासाठी आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे शिष्टमंडळाला थोरात यांनी सांगितले. यावेळी राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे, विभागीय अध्यक्ष सोमनाथ गवळी, जिल्हाध्यक्ष शशिकांत निमसटकर, रमेश घुगे, गंगाधर सातपुते, अशोक शिंदे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
कोतवालांच्या मागण्यांचे मंत्र्यांना दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:45 AM