पुसद : विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व इतर वस्तूंच्या जीवघेण्या दरवाढीविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले. त्यातून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर व इतर वस्तूंची दरवाढ त्वरित कमी करण्याची मागणी केली.
कोरोनाच्या महामारीत जनतेचे जगणे कठीण झाले आहे. रोजगार, व्यापार, शेती, व्यवहार ठप्प झाले. अशात सतत दरवाढ करून केंद्र सरकार जनतेची लूटमार करीत आहे, असा आरोप निवदेनातून करण्यात आला. महागाईसाठी काँग्रेसवर टीका करणारे भाजप नेते केंद्रात भाजप सरकार आल्यावर भाव दुपटीने वाढवित आहे. या भाववाढीचा विदर्भ राज्य आंदोलन समितीने निषेध केला. त्वरित भाववाढ मागे घ्यावी, अशी मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. निवेदन देताना अब्दुल रहेमान चव्हाण, फिरोज खान, संतोष आंभोरे, मोहम्मद जिब्रान, निखिल टोपलेवार, राज खान आदी उपस्थित होते.