लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आदिवासी मुलींवर घडलेल्या अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद यवतमाळातही उमटले. यातील नराधमांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत आदिवासी बांधवांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.बिरसा क्रांती दल तसेच आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या पुढाकारात आदिवासी बांधव दुपारी जिल्हा कचेरीत पोहोचले. राजुरा येथील इन्फंट जिजस पब्लीक स्कूल या शाळेत अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिंक अत्याचार झाले. पीडित मुलींचा आकडा १८ ते २० पर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात ६ एप्रिल रोजी राजुरा पोलिसांकडे तक्रार झाल्यावरही सात दिवस पोलिसांनी काहीच केले नाही, असा आरोप आदिवासी बांधवांनी निवेदनातून केला.यामध्ये वसतिगृहाच्या नराधम कर्मचाऱ्यांसह त्यांना सहकार्य करणाºया महिला कर्मचारीही दोषी आहेत. संस्था चालक व संचालक मंडळ काय करीत होते असा सवाल उपस्थित करण्यात आला. या सर्व दोषींची सीबीआय चौकशी करण्यात यावी, दोषींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे नोंदवून तत्काळ निलंबित करावे, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, दोन ज्येष्ठ व तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करावी आदी मागण्या करण्यात आल्या.जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, आदिवासी विकास विभाग व शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे तसेच चंद्रपूर जिल्हाधिकारी व एसपींकडे निवेदन पाठविण्यात आले. यावेळी बिरसा क्रांती दलाचे राज्य महासचिव प्रमोद घोडाम, प्रफुल्ल कोवे, निशांत सिडाम, शिवनारायण बोरकडे, शरद चांदेकर, संजय मडावी, वसंतराव कनाके, माणिक मडावी, प्रा. विनोद तलांडे, बाबाराव मडावी, पी.एस. कंगाले, सुरेश कोडापे, प्रभात कनाके, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे सुरेश कनाके, गुलाबराव कुडमेथे, पवनकुमार आत्राम, किशोर उईके आदी उपस्थित होते.
राजुरातील अत्याचाराचे यवतमाळात पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 9:42 PM
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे आदिवासी मुलींवर घडलेल्या अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद यवतमाळातही उमटले. यातील नराधमांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत आदिवासी बांधवांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
ठळक मुद्देनराधमांना कठोर शिक्षा द्या : आदिवासी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक