शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

‘फिपुल्यां’च्या दुनियेत अजूनही बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 5:00 AM

जिल्ह्यात जवळपास १७० पेक्षा अधिक फुलपाखरांच्या विविधरंगी प्रजाती आढळतात. सर्वत्र कोरोनाचा कहर असला तरी फुलपाखरांच्या दुनियेत अजूनही आनंदाचा बहर कायम आहे. पण या इवल्याशा महत्त्वाच्या जीवाचा म्हणावा तेवढा सखोल अभ्यास आजवर झाला नाही. डॉ. रमजझान विराणी, प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांच्यासारखे मोजके अभ्यासक या जीवाची दखल घेऊन अभ्यास करीत आहेत.

ठळक मुद्देइवलेसे जीव वनसमृद्धीचे निदर्शक : टिपेश्वर, पैनगंगा अभयारण्यासह उमर्डातही अधिवास

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे, पण या वनसंपदेच्या समृद्धीचे जे खरे पाईक आहेत, त्या फुलपाखरांची दुनिया खऱ्या अर्थाने ही श्रीमंती भोगत असतात. सध्या देशभरात फुलपाखरांबाबत जनजागृती करण्यासाठी ‘बटरफ्लाय मंथ’ साजरा केला जात आहे. ‘राष्ट्रीय फुलपाखरा’साठी निवडणूक घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘फिपुल्यां’च्या दुनियेची ही एक सफर...जिल्ह्यात जवळपास १७० पेक्षा अधिक फुलपाखरांच्या विविधरंगी प्रजाती आढळतात. सर्वत्र कोरोनाचा कहर असला तरी फुलपाखरांच्या दुनियेत अजूनही आनंदाचा बहर कायम आहे. पण या इवल्याशा महत्त्वाच्या जीवाचा म्हणावा तेवढा सखोल अभ्यास आजवर झाला नाही. डॉ. रमजझान विराणी, प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांच्यासारखे मोजके अभ्यासक या जीवाची दखल घेऊन अभ्यास करीत आहेत. डॉ. विराणी यांनी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात १०३ फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली. तर डॉ. जोशी यांनी यवतमाळनजिकच्या उमर्डा नर्सरीमध्ये बºयाच प्रजाती नोंदविल्या. दोन वर्षांपूर्वी अमोलकचंद महाविद्यालयाच्याच निसर्गरम्य परिसरात फुलपाखरांचा अभ्यास करण्यात आला, तेव्हा १५ प्रजातींची नोंद झाली. टिपेश्वर अभ्यारण्याच्या विस्तीर्ण परिसरात राऊंडेड पायरोट, डनाईड एगफ्लाय, प्लेन टायगर, कॉन ग्रास येलो, बॅरोनेट, लाईम बटरफ्लाय, पेंटेड लेडी अशी विविधांगी फुलपाखरे आढळतात. हीच स्थिती उमरखेडच्या पैनगंगा अभयारण्याची आहे. सायखेडा धरण, उमर्डा नर्सरी, बेंबळा धरण आदी ठिकाणी अभ्यास होण्याची गरज आहे.विदर्भाच्या ‘या’ उमेदवाराला निवडून द्या !राष्ट्रीय फुलपाखरु निश्चित करण्यासाठी देशभरातील अभ्यासकांनी एकत्र येऊन फुलपाखरु निवडणूक आयोजित केली आहे. त्यात सात प्रकारच्या फुलपाखरांना ‘उमेदवारी’ देण्यात आली आहे. या सात पैकी कॉमन जेझबेल हे फुलपाखरु यवतमाळसह विदर्भाच्या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे या सुंदर फुलपाखराला अभ्यासकांनी एकप्रकारे विदर्भाचा प्रतिनिधी म्हणून देशपातळीवर मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न चालविला आहे. ऑनलाईन होत असलेल्या निवडणुकीत कॉमन जेझबेलला भरघोस मतदान करून राष्ट्रीय फुलपाखरु म्हणून निवडून द्यावे, असे आवाहन मानद वन्यजीव अभ्यासक डॉ. रमझान विराणी यांनी केले आहे.निरोगी पर्यावरणाचे निदर्शक म्हणून फुलपाखरे महत्वाची आहे. परागीकरणातही त्यांची भूमिका महत्वाची आहे. म्हणून पक्षांप्रमाणे फुलपाखरांचेही संरक्षण संवर्धन केले पाहिजे. जनजागृतीसाठी शाळांमध्ये फुलपाखरांच्या अधिवासांना असलेल्या धोक्याची माहिती द्यावी.- डॉ. रमझान विराणीमानद वन्यजीवअभ्यासक, पांढरकवडाकॉमन टायगर बटरफ्लाय, स्लेटेड टायगर बटरफ्लाय या फुलपाखारांच्या प्रजाती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांची संख्या कायम ठेवणे फ्लावर प्लॉन्टेशनवर अवलंबून आहे. उमर्डा नर्सरीसारख्या ठिकाणी ओलसर भूभाग, मिनरल्स असल्याने फुलपाखरे आढळतात.- प्रा.डॉ. प्रवीण जोशी,अमोलकचंद महाविद्यालययवतमाळजिल्ह्यात फुलपाखरे आढळणारी ठिकाणेजिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य हे फुलपाखरांचे सर्वात मोठे आश्रयस्थान ठरले आहे. त्या पाठोपाठ पांढरकवडाजवळील सायखेडा धरण, अमोलकचंद महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर, यवतमाळजवळील उमर्डा नर्सरी, बेंबळा जलाशयाचा परिसर आदी ठिकाणी फुलपाखरांच्या देखण्या प्रजाती आढळतात.कोरोनामुळे मावळला बटरफ्लाय मंथच्या उपक्रमांचा उत्साहदरवर्षी बटरफ्लाय मंथच्या निमित्ताने येथील उमर्डा नर्सरी परिसरात विद्यार्थ्यांची सहज आयोजित करून प्रत्यक्ष फुलपाखरांची माहिती दिली जाते. मात्र यावर्षी कोरोनामुळे अशा सहलीवर निर्बंध आले असून आॅनलाईन मार्गदर्शनावर भर दिला जात आहे.फुलपाखरांच्या दुनियेला धोक्यांचा विळखाजिल्ह्यात झुडुपी जंगले विरळ होत आहे. वृक्षतोड वाढली आहे. ज्या परिसरात फुलपाखरांचा बहुतांश अधिवास असतो, तेथे शेतीचे अतिक्रमण वाढत आहे. यामुळे फुलपाखरांचा वावर कमी होत आहे. याशिवाय कीटकनाशकांचा बेसुमार वापर वाढल्यामुळेही फुलपाखरांच्या अस्तित्वावर गदा येत आहे. विविध कारणांनी तापमान वाढल्यामुळे फुलपाखरांच्या प्रजननावर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे फुलपाखरांना आवडणाºया फुलझाडांची लागवड वाढविण्याची गरज आहे.