शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

ठोक भाजी विक्रेत्यांचा संपाचा इशारा

By admin | Published: January 18, 2016 2:31 AM

अतिक्रमण हटाव मोहिमेच्या रडारवर असलेल्या ठोक भाजी विक्रेत्यांनी पर्यायी जागेवर सुविधा नसल्याचा आरोप करीत सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

अतिक्रमण हटावचा परिणाम : पर्यायी जागेवर सुविधा नसल्याचा आरोप यवतमाळ : अतिक्रमण हटाव मोहिमेच्या रडारवर असलेल्या ठोक भाजी विक्रेत्यांनी पर्यायी जागेवर सुविधा नसल्याचा आरोप करीत सोमवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे यवतमाळ शहरातील भाजी विक्री व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे तर प्रशासन पर्यायी जागेवर सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे.यवतमाळ शहरातील ठोक भाजी बाजार गेल्या कित्येक वर्षांपासून आठवडीबाजारात भरविला जातो. सोमवार वगळता दररोज पहाटे या ठिकाणी जिल्हाभरातून आलेल्या भाज्यांचा लिलाव केला जातो. मात्र ही जागा नगर परिषदेची असून यावर ठोक भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. आता हेच अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेने अल्टीमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत अतिक्रमण काढले नाही तर बुलडोजर चालविण्याचा इशारा दिला आहे. यामुळे हादरलेल्या ठोक भाजी विक्रेत्यांनी प्रशासनाचे दार ठोठावले. पर्यायी जागेचा शोध सुरू झाला. त्यानुसार विठ्ठलवाडी परिसरातील कॉटन मार्केट लगतची जागा देण्याचे ठरविण्यात आले. परंतु त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नाही. मोकळे मैदान आहे, अशा स्थितीत लिलाव करणे अशक्य आहे. त्यामुळे पर्यायी जागा देईपर्यंत आठवडीबाजारातील दुकाने हटवू नये, अशी भूमिका ठोक भाजी विक्रेत्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारपासून दुकाने काढण्याची तयारी केली आहे. (शहर वार्ताहर)टीएमसी प्रकल्पात ‘नो एन्ट्री’ ठोक भाजी विक्रेत्यांना विठ्ठलवाडी परिसरात खुली जागा देणे प्रस्तावित केले आहे. मात्र त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नाही. या जागेलगतच कृषी उत्पन्न बाजार समितीचा टीएमसी प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी भाजी बाजाराचा लिलाव करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ठोक विक्रेत्यांनी केली आहे. परंतु सहकार विभागाच्या प्रभारी जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवी यांनी त्याला नकार दिला आहे. हा प्रकल्प कापसाकरिता असल्याने भाजी विक्रीला देता येणार नसल्याचे सांगितले.