लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील घोन्सा खुल्या कोळसा खाणीत उत्खननासाठी केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगनंतर मोठमोठे दगड परिसरातील शेतांमध्ये जाऊन पडत आहेत. यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.या खाणीच्या वाढीव क्षेत्रात सध्या कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खाणीत मोठमोठाले स्फोट घडविले जात आहेत. स्फोटादरम्यान खाणीतील मोठमोठाले दगड आजुबाजूच्या शेतांमध्ये जाऊन आदळत आहे. सध्या खरिप हंगामाची कामे शेतामध्ये सुरू आहे. मजुरासह स्वत: शेतमालकदेखिल त्यासाठी शेतात राबत आहे. त्यातच आता लगतच्या कोळसा खाणीत ब्लास्टिंग केली जात असल्याने शेतात येऊन पडणाऱ्या दगडांमुळे शेतकरी, शेतमजुर भयभीत झाले आहे. खाणीला लागूनच वणी-घोन्सा मार्गावर एक कॉन्व्हेंटदेखिल आहे. ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वेकोलिद्वारे स्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटाची तिव्रता इतकी होती, की स्फोटानंतर खाणीतील मोठमोठे दगड या कॉन्व्हेंटसमोर येऊन पडले. एवढेच नव्हे, तर लागुनच असलेल्या डॉ.जानराव ढोकणे यांच्या शेतातदेखिल दगडांचा खच पडला. याचवेळी या शेतात मजूर काम करित होते. स्फोटानंतर दगड येऊन पडताच या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढला. यासंदर्भात परिसरातील गावकऱ्यांनी वेकोलिला वारंवार सूचना देऊनही वेकोलिकडून मुजोरपणे दिवसाढवळ्या स्फोट घडविले जात असल्याचा आरोप आहे.एसडीओंकडे तक्रारनियमानुसार सुरक्षेची काळजी घेऊन स्फोट घडविणे आवश्यक असताना, अशी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने संबंधित वेकोलिच्या अधिकाऱ्यांविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी डॉ.जानराव ढोकणे यांनी वणीचे एसडीओ डॉ.शरद जावळे यांच्याकडे केली आहे.
ब्लास्टिंगचे दगड शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 5:00 AM
या खाणीच्या वाढीव क्षेत्रात सध्या कोळसा उत्खननाचे काम सुरू आहे. त्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खाणीत मोठमोठाले स्फोट घडविले जात आहेत. स्फोटादरम्यान खाणीतील मोठमोठाले दगड आजुबाजूच्या शेतांमध्ये जाऊन आदळत आहे. सध्या खरिप हंगामाची कामे शेतामध्ये सुरू आहे. मजुरासह स्वत: शेतमालकदेखिल त्यासाठी शेतात राबत आहे.
ठळक मुद्देघोन्सा कोळसा खाण : दिवसा केले जातात स्फोट, शेतकरी-मजुरात दहशत