लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या नांदेड सीमेवरील उमरखेड येथे सोमवारी मुस्लीम समाजाच्यावतीने छत्तीसगडमधील एका घटनेच्या निषेधार्थ सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान अचानक बसस्थानक चौकात काही बँका व दुकानांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली गेली. अचानक झालेल्या या दगडफेकीने कुणालाच काही सुचले नाही. त्यामुळे व्यापारी व रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांची पळापळ झाली. या घटनेने उमरखेडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. अवघ्या काही क्षणातच उमरखेडमधील बाजारपेठ बंद झाली. त्यानंतर ४०० ते ५०० व्यापाऱ्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यावर धडक देऊन या मूक मोचार्तून झालेल्या दगडफेकीचा जाब विचारला. व्यापाऱ्यांचा जमाव अद्याप पोलीस ठाण्यात असून उमरखेडमधील तणाव कायम आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे दुकानांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:46 PM
जिल्ह्याच्या नांदेड सीमेवरील उमरखेड येथे सोमवारी मुस्लीम समाजाच्यावतीने छत्तीसगडमधील एका घटनेच्या निषेधार्थ सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान अचानक बसस्थानक चौकात काही बँका व दुकानांवर दगडफेक करण्यात आली.
ठळक मुद्देबाजारपेठ बंदव्यापाऱ्यांची पोलीस ठाण्यावर धडक