लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील बंजार कॉलनीतील रहिवासी अपूर्व छगनलाल राठोड (२४) याचा पुसद-पुणे दरम्यान प्रवासात मारहाणीत मृत्यू झाला. या खून प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रविवारी बंजारा समाज बांधवांनी तालुक्यातील मारवाडी येथे रास्ता रोको आंदोलन केले.अपूर्व राठोड याला ट्रॅव्हल्समध्ये चालक व इतरांनी मारहाण केली. औरंगाबादनजीक वाळुंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला. तेथील पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. मात्र अपूर्वचा अपघात नसून बसचालक, क्लिनर, मालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी व समाजबांधवांनी केला आहे. यापूर्वी पुसद एसडीपीओ अनुराग जैन यांना मूक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा मारवाडी येथे समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले.पुसद ते वाशिम मार्गावरील मारवाडी फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. मात्र खंडाळा पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व प्रा.आरजुनिया सितिया भुकिया, सुधाकर कांबळे, रमेश यिसकावत, सुभाष राठोड, रूपेश वढतीया, मनोहर राठोड, अक्षय राठोड आदींनी केले. आंदोलनकर्त्यांनी ती खासगी बस जप्त करून या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली.दरम्यान, सदर ट्रॅव्हल्स औरंगाबाद आरटीओंनी काळ्या यादीत टाकल्याची माहिती आहे. तरीही दररोज पुसद ते पुणे दरम्यान ही वाहने धावत आहे, हे विशेष.
मारवाडी येथे बंजारा समाजाचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 5:00 AM
अपूर्व राठोड याला ट्रॅव्हल्समध्ये चालक व इतरांनी मारहाण केली. औरंगाबादनजीक वाळुंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला. तेथील पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. मात्र अपूर्वचा अपघात नसून बसचालक, क्लिनर, मालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी व समाजबांधवांनी केला आहे.
ठळक मुद्देअपूर्व राठोड खून प्रकरण : सीआयडी चौकशीची मागणी, समाजबांधवांमध्ये संताप