लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव/फुलसावंगी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शनिवारी फुलसावंगीत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर धनोडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.फुलसावंगी येथील समाजबांधवांनी बंदची हाक दिली होती. त्याला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. फुलसावंगी परिसरातील राहूर, शिरपुल्ली, कुपटी, नारळी, काळी, टेंभी, वरोडी येथील मराठा समाजबांधव बंदमध्ये सहभागी झाले. गावातून घोषणाबाजी करीत रॅली काढली. नंतर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.धनोडा येथे टी-पॉर्इंटवर सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात महागाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी प्रवीण ठाकरे , तेजस नरवाडे, डॉ.शिंदे यांनी मार्गदर्शन केले. महागावचे ठाणेदार कैलास भगत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गेल्या काही दिवसांपासून उमरखेड, महागाव तालुक्यात मराठा आंदोलनाचे लोण पसरले आहे. त्यामुळे सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी सजग आहे. उमरखेड येथील दगडफेकीनंतर पोलीस चांगलेच सतर्क झाले आहे. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
फुलसावंगी बंद, धनोडात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:36 PM
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शनिवारी फुलसावंगीत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर धनोडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फुलसावंगी येथील समाजबांधवांनी बंदची हाक दिली होती.
ठळक मुद्देमराठा समाज : आरक्षणाची मागणी, पोलिसांचा चोख बंदोबस्त, कुठेही अनुचित प्रकार नाही