शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबले; प्रत्येक बसचे कळणार ‘लाईव्ह लोकेशन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 5:00 AM

दुसऱ्या गावावरून येणारी एसटी आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे थेट लोकेशन त्यावरून पाहायला मिळणार आहे. या एसटीची गती तासी किती आहे त्यानुसार एसटी किती किलोमीटर अंतरावर आहे हे कळण्यास मदत होणार आहे. यातून प्रवाशांना आपला वेळ वाचविता येणार आहे. याशिवाय चालकांकडून अनेकवेळा वेळेचा दुरुपयोग होता. हा दुरुपयोगही या आधुनिक पद्धतीमुळे थांबविता येणार आहे. 

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळ कात टाकतेय : प्रवाशांचा वेळ वाचणार, गतीला ब्रेक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : गाव तिथे एसटी असे एसटीचे ब्रीद वाक्य आहे. हात दाखवा एसटी थांबवा म्हणत प्रत्येक गावातील प्रवासी शहरापर्यंत आणण्याचे काम एसटी महामंडळ करते आहे. आता या एसटीला काळानुसार गती देण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचविण्यासाठी एसटी माॅडर्न झाली आहे. त्याला ट्रॅकिंग सिस्टिमने जोडले जात आहे. यामुळे दुसऱ्या गावावरून येणारी एसटी आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे थेट लोकेशन त्यावरून पाहायला मिळणार आहे. या एसटीची गती तासी किती आहे त्यानुसार एसटी किती किलोमीटर अंतरावर आहे हे कळण्यास मदत होणार आहे. यातून प्रवाशांना आपला वेळ वाचविता येणार आहे. याशिवाय चालकांकडून अनेकवेळा वेळेचा दुरुपयोग होता. हा दुरुपयोगही या आधुनिक पद्धतीमुळे थांबविता येणार आहे. 

गाडीची स्पीड, लोकेशनही कळणार

- यवतमाळ जिल्ह्यातील नऊही आगारांमध्ये आधुनिक स्वरूपाची यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. - प्रायोगिक तत्त्वावर त्याची पाहणी करण्यता येत आहे. या पद्धतीत बसस्थानकावर स्क्रीनही लावली जाणार आहे.- प्रवाशाला ज्या गावास जायचे आहे त्या गावची बस स्थानिक बसस्थानकावर पोहोचण्यास किती वेळ आहे याचे लोकेशन स्क्रीनवर मिळणार आहे.

बसस्थानकात लागणार मोठे स्क्रीन

-  महामंडळाच्या नऊही आगारांमध्ये मोठे स्क्रीन लागणार आहे. या ठिकाणी गाडीचे लोकेशन कळेल.-  जिल्ह्यातील ४०८ एसटी बसेसला ट्रॅकिंग सिस्टिम बसविली जात आहे. त्या दृष्टीने परिवहन महामंडळाने युद्ध पातळीवर कामकाज सुरू केले आहे.-  लवकरच सिस्टिम सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी लोकार्पित केली जाणार आहे. यामध्ये एसटी बस कुठल्या मार्गावर किती अंतरावर आहे याची माहिती प्रवाशांना कळणार आहे.

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप- अनेक वाहनचालक वाहन चालविताना स्पीड लाॅक तोडून वेगाने गाडी चालवितात. अशावेळी एसटीची गती ट्रॅकिंग सिस्टिममुळे माहीत पडणार आहे. यातून अपघाताला टाळता येणार आहे.- अनेक चालक काही स्टाॅपवर वाटेल तेवढा वेळ थांबलेले असतात. काही चालक आपल्या गावाला गाडी उभी करतात.- यामुळे बसस्थानकावर गाडी पोहोचण्यासाठी नियोजित वेळेला थोडा वेळ लागतो. हे सर्व प्रकार ट्रॅकिंग सिस्टिममुळे उघड होणार आहेत.

 

टॅग्स :state transportएसटी