शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

चोंढी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले

By admin | Published: July 05, 2014 11:48 PM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी शुक्रवारी चोंढी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.

‘नरेगात’ भ्रष्टाचार : तक्रारीवर चौकशीशिवाय कामे सुरूबाभूळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी शुक्रवारी चोंढी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. सदर ग्रामपंचायतीत २०१२-१३ मध्ये ‘नरेगा’ अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली. यामध्ये चोंढी ते करळगाव शिव पांदण रस्त्याचा समावेश आहे. प्रत्यक्षात सदर रस्ता झालाच नाही. तरीही ४ फेबु्रवारी २०१२ ते १३ मे २०१४ या कालावधीत चार लाख ९५ हजार ६०० रुपयांचे काम कागदोपत्री दाखविण्यात आले. कामाशिवाय निधी लाटण्यात आला. सरपंच, सचिव, पोस्टमास्तर, कनिष्ठ शाखा अभियंता यांनी संगणमत करून हा निधी हडप केला. याविषयीची तक्रार करूनही चौकशी झाली नाही. सदर प्रकाराची माहिती २७ जूनला बाभूळगाव तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिली होती. चौकशी न झाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याच्या इशारा त्यावेळी दिला होता. मात्र प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने कार्यालयाला कूलूप ठोकून ग्रामस्थांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी उपसरपंच नीलेश कदम, ग्रामपंचायत सदस्य डॉ.अशोक राऊत, गुलाब गाडेकर, अरविंद भोसले, कमला राजूरकर, आशा कोहरे, नंदा नाईक, लता माने, सुमित्रा बारबुधे, माधुरी मोहिते, विनोद पिंपळकर, पंचफुला राजुरकर, कामिनी कदम, भावना वाडेकर, फुला वाडेकर, वच्छला बोडेकर, प्रतिभा काळे, अंजना कोहरे, उषा उगले, रायजा मांगुळकर, निर्मला खंडागळे, देवकी कोहरे, सिंधू महाडिक, इंदिरा परागे, रेखा जाधव, प्रभाकर ठक, सुवर्णा भोसले, बेबी ठक, विनायक मांगुळकर, पैकू वाडेकर, संजय मोहिते, माला डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)