लोकमत न्यूज नेटवर्कअकोलाबाजार : पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसलेल्या अकोलाबाजारवासीयांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी कंबर कसली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्यासाठी अकोलाबाजारमध्ये सध्या तुफान आलया. बुधवारी सकाळी गावातून जलदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांनी श्रमदानातून मोठ्या उत्साहात दगडी बांध बांधला.पाणी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत अकोलाबाजारने सहभाग घेतला आहे. नऊ सदस्यांनी वाठोडा येथे चार दिवसीय प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर गावात कामाला सुरुवात केली. रोपवाटिका, माती परीक्षण, शोषखड्डे, शिवार फेरी आदी कामे केली जात आहे. यासाठी युवक, महिला, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत, पत्रकार आदींचा सहभाग लाभत आहे. गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे.जलदिंडीत गावकºयांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. जलदिंडीनंतर गाव शिवारातील नाल्यावर दगडी बांध बांधण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे, पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील, नरेंद्र मोदी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, मंडळ अधिकारी राजेश नागलकर, तालुका समन्वयक समाधान इंगळे, परिसरातील मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक, वैद्यकीय अधिकारी यांनी गावकºयांसह श्रमदान केले. जिल्हा परिषद हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाणी फाऊंडेशनचे नारे देत गावकºयांना प्रोत्साहित केले. उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पाणी फाऊंडेशनसंदर्भात मार्गदर्शन करून गावकºयांना श्रमदानाचे आवाहन केले.
पाणीदार गावासाठी ‘तुफान आलया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 9:59 PM
पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसलेल्या अकोलाबाजारवासीयांनी गाव पाणीदार बनविण्यासाठी कंबर कसली आहे. सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्यासाठी अकोलाबाजारमध्ये सध्या तुफान आलया. बुधवारी सकाळी गावातून जलदिंडी काढून जनजागृती करण्यात आली.
ठळक मुद्देअकोलाबाजार : रेणू शिंदे, स्वप्नील तांगडे यांच्यासह ग्रामस्थांचे श्रमदान