शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

दमदार पाऊस तरीही प्रकल्प तहानलेलेच

By admin | Published: July 18, 2016 12:49 AM

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे.

४७८ मिमी नोंद : मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये निम्माच जलसाठा, पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांची स्थितीही जेमतेम यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस कोसळत असला तरी मोठे आणि मध्यम प्रकल्प अद्यापही तहानलेलेच दिसत आहे. वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस पडूनही प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झाला नाही. बहुतांश प्रकल्पात क्षमतेच्या अर्धा अधिक जलसाठा झाला असून या प्रकल्पांना आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात एक मोठा, पाच मध्यम आणि ६२ लघु प्रकल्प आहे. सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी याप्रकल्पाचा उपयोग होता. अलिकडच्या काही वर्षात अपुऱ्या पावसाने या प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालाच नाही. मात्र यंदा वरूण राजाच्या कृपेने जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडुंब भरतील, अशी आशा आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी असून आतापर्यंत जिल्ह्यात ४७८ मिमी पाऊस कोसळला आहे. नदी, नाल्यांना पूर आला होता. मात्र प्रकल्पांमध्ये अद्यापही पुरेसा जलसाठा झाला नाही. पुसद तालुक्यातील पूस प्रकल्पात ३९ टक्के, दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पात २५.६१ टक्के, बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पात २९ टक्के, दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्पात ६० टक्के, यवतमाळ तालुक्यातील वाघाडी प्रकल्पात ४५ टक्के, बोरगाव प्रकल्पात ६७ टक्के, महागाव तालुक्यातील वेणी येथील लोअरपूस प्रकल्पात ५२ टक्के, अडाण प्रकल्पात २७.९३ टक्के आणि मारेगाव तालुक्यातील नवरगाव प्रकल्पात ६४.५३ टक्के जलसाठा झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पापैकी केवळ पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या प्रकल्पात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांमध्ये ५२ टक्के जलसाठा झाला असून त्यापैकी कापरा, सिंगनडोह, रूई, इठोडा, किन्ही, पहूर, नरसाळा, पोफाळी, पोखरी, निंगनूर, दराटी, तरोडा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र इतर प्रकल्पात अद्यापही निम्माच जलसाठा आहे. गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. सध्याही ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा जलसाठा निश्चितच वाढणार आहे. हे प्रकल्प तुडुंब झाल्यास रबी हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. (नगर प्रतिनिधी)