शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

सशक्त विद्यार्थीच देशाची ताकद

By admin | Published: September 20, 2015 12:04 AM

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची वेळोवेळी मदत लाभली. आता खासदार विजय दर्डा यांचेही आवश्यक ते सहकार्य लाभते, असे संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल यांनी सांगितले.

विजय दर्डा : नेर येथील नेहरु महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सवनेर : पुस्तकी ज्ञानापेक्षा लोकांशी कसे वागावे हे शिकविणे महत्वाचे आहे. जीवन-विज्ञान हे विषय प्रत्येक महाविद्यालयात शिकविले गेले पाहिजे. हा विषय प्रत्येक विद्यार्थ्याने गिरवला पाहिजे. महाविद्यालयाचा विद्यार्थी सशक्त तर देश सशक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी केले. येथील नेहरु शिक्षण संस्थेद्वारा संचालित नेहरु महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड उद्घाटक होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘शब्दशिल्प’चे प्रकाशन करण्यात आले. विजय दर्डा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, तुम्ही यशस्वी होऊन जगात कोणत्याही उंचीवर गेले तरी आपल्या मातीशी नाळ तुटू देऊ नका, आपण जेथे घडलो त्या महाविद्यालयाला कधीही विसरु नका. आई-वडील, गुरुजन आणि मित्रांशी तुमचे नाते पवित्रतेच्या आधारावरच असावे. महाविद्यालयीन जीवनात शिस्तीलाही महत्व आहे. प्रामुख्याने स्वच्छतेविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यासाठी त्यांनी जपानमधील उदाहरण दिले. तेथील विद्यार्थी दिसलेला कचरा लगेच कचरा पेटीत टाकतात. स्वच्छतेची हीच शिस्त प्रत्येकात असायला हवी. जपानमध्ये लालुप्रसाद यादव आणि आपल्याशी घडलेला स्वच्छतेविषयीचा अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. नेरच्या मातीशी असलेले ऋणानुबंध सांगताना त्यांनी नेहरू महाविद्यालयाने कठीण प्रसंगातून ५० वर्षांचा पल्ला गाठला, ही बाब गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोप सोहळ्याला आपण सिने सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्याला घेऊन हजर राहू, अशी ग्वाही यावेळी दर्डा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांचा युनिफॉर्म बदलण्याची आणि तो कलरफूल करण्याची सूचना त्यांनी मांडली. त्याला विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी नेहरु शिक्षण संस्थेसाठी कुठलीही मदत पुरविण्याची ग्वाही दिली. परमानंद अग्रवाल यांनी संस्थेच्या विकासासाठी घेतलेल्या परिश्रमाचे त्यांनी भरभरुन कौतुक केले. नेहरु शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल यांनी यावेळी शासनाच्या शैक्षणिक धोरणावर सडकून टीका केली. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी हे आपले राजकारणातील गुरु असल्याचेही आवर्जुन सांगितले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष पवन जयस्वाल, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, नेहरु महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल, प्राचार्य राजीव सदन, पुंडलिकराव चिरडे, मजहर खॉ पठाण, डॉ. मोहन शर्मा, राजेश अग्रवाल, राजेंद्र चिरडे, डॉ. संजय काळे, सुनील घोटकर, मोबीन खान, भास्कर सोनोने आदी उपस्थित होते.प्रास्ताविकातून प्राचार्य राजीव सदन यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. संगीत विभाग प्रमुख प्रा. संतोष दातीर यांच्यासह पूनम कदम, पल्लवी वरुडकर, मयुरी चव्हाण, आस्तिक राठोड, सायमा सदफ यांनी स्वागतगीत सादर केले. संचालन प्रा. बनसोड यांनी तर आभार प्रा.शांतरक्षित गावंडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)दर्डा परिवाराचे मोठे योगदान - परमानंद अग्रवालनेहरू शिक्षण संस्था बळकट करण्यामध्ये दर्डा परिवाराचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची वेळोवेळी मदत लाभली. आता खासदार विजय दर्डा यांचेही आवश्यक ते सहकार्य लाभते, असे संस्थेचे अध्यक्ष परमानंद अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी अग्रवाल यांनी नेर शहरात सांस्कृतिक भवनासाठी ४० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली. ही मागणी मान्य करीत खासदार विजय दर्डा यांनी सांस्कृतिक भवनासाठी लागेल तेवढा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विजय दर्डा यांनी दिली विद्यार्थ्यांना शपथ कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना तीन मुद्यांवर शपथ घेण्याचे भावनिक आवाहन केले. मी कुठेही कचरा फेकणार नाही आणि कुणी फेकला तर तो स्वत: उचलेल. आपली घरी कुणी तरी वाट पाहत आहे याचे सतत स्मरण ठेऊन वाहन चालविताना अथवा मागे बसताना मी हेल्मेट वापरेल. समाजात वावरताना कुणालाही आवश्यकता असेल त्यावेळी सर्वतोपरी मदतीचा हात स्वत:हून पुढे करेल.