चार चोऱ्या उघड : ५० ग्रॅम सोने हस्तगत यवतमाळ : शहरातील सुभाषनगर, मंगलमूर्तीनगर, आंबेडकरनगर, फैजनगर येथे जून महिन्यात झालेल्या घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहे. टोळीविरोधी पथकाने अट्टल घरफोड्याला अटक केली असून त्याच्याकडून ५० ग्रॅम सोने आणि ११६ ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे. गजानन एकनाथ मराठे (४२) रा.रविदासनगर असे चोरट्याचे नाव आहे. पोलीस दप्तरी कुख्यात असलेल्या गजाननवर दोन महिन्यापासून पोलिसांचा वॉच होता. टोळीविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, उपनिरीक्षक संतोष मनवर यांनी गजाननला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी इिली. कोठडीत गजाननने शहर ठाण्याच्या हद्दीतील घनश्याम पंडित हटकर रा.आंबेडकरनगर, फैजनगरातील शर्मा, हर्षल चव्हाण रा.सुभाषनगर, मंगलमूर्तीनगरातील विजय रणखांब यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत टोळी विरोधी पथकाचे गजानन धात्रक, संजय दुबे, किरण पडघन, अमोल चौधरी, विनोद राठोड यांनी सहभाग घेतला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा तपास करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)
अट्टल घरफोड्यास अटक
By admin | Published: August 15, 2016 1:20 AM