दिग्रसची घटना : मेसेज पाठवून देत होता त्रासलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : अभियांत्रिकी विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीवरून एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिग्रस पोलिसांनी दाखल केला. सदर तरुण मोबाईलवर मॅसेज टाकून तिला त्रास देत असल्याचे पुढे आले आहे.दिग्रसच्या गुरूदेवनगरातील काजल रमेश उडाखे (२०) हिने बुधवारी घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. ती पुसदच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी पंचनामा केला, त्यावेळी मृतदेहाजवळ दोन चिठ्ठ्या आढळल्या. त्यात कविश रमाकांत सप्रे रा.विठ्ठलनगर, दिग्रस हा तरुण मोबाईलवर मॅसेज टाकून मानसिक त्रास देत होता. तसेच वारंवार फोन करून छळत होता, असे लिहिले आहे. या प्रकरणी काजलचे वडील रमेश उडाखे यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून कविश सप्रेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. दरम्यान, जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका काजलच्या नातेवाईकांनी घेतली होती. अखेर पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी समजूत काढल्याने नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले. त्यानंतर तिच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांसह नातेवाईक उपस्थित होते. वृत्तलिहिस्तोवर तरुणाला अटक झाली नव्हती.
विद्यार्थिनीची आत्महत्या, तरुणावर गुन्हा दाखल
By admin | Published: June 23, 2017 1:55 AM