शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

विद्यार्थ्यांची हजेरी अ‍ॅपवर

By admin | Published: January 01, 2017 2:18 AM

शाळांमध्ये विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे.

जिल्हा परिषद सज्ज : आठवडाभरात सुरू होणार अंमलबजावणी अविनाश साबापुरे यवतमाळ शाळांमध्ये विविध उपक्रमांचा धडाका लावणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने आता पटसंख्येवर नजर रोखली आहे. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती यापुढे मोबाईल अ‍ॅपवर नोंदविण्यात येणार आहे. शनिवारी यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी सीईओंकडे मंजुरीसाठी पाठविला. स्थलांतर आणि अन्य कारणांमुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या टिकविणे जिकिरीचे झाले आहे. यावर प्रशासनाने मोबाईल अ‍ॅपचा उतारा शोधला आहे. वास्तविक अनेक जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यापूर्वीही झाला आहे. आता शिक्षण विभागाने एलआयसीच्या माध्यमातून ‘डेली अटेंडन्स’ हा अधिकृत अ‍ॅप तयार केला आहे. सोमवारी २ जानेवारीपासूनच या अ‍ॅपवर विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नोंदविण्याचे शासनाचे नियोजन आहे. परंतु यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षकांना पुरेसा वेळ देऊन आठवडाभरात याची अंमलबजावणी सुरू करेल, असे संकेत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही इंटरनेटची रेंज पोहोचलेली नाही. चालू शैक्षणिक सत्रापासून शासनाने सक्तीचा केलेला पोषण आहाराचा एमडीएम अ‍ॅपही अनेक शिक्षक दररोज अपडेट करू शकलेले नाही. त्यातच आता दैनंदिन हजेरी मोबाईल अ‍ॅपवर नोंदविताना अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. प्रत्येक वर्गशिक्षकाला या अ‍ॅपमध्ये आपला मोबाईल क्रमांक अधिकृतपणे रजिस्टर्ड करूनच आपापल्या वर्गाची हजेरी नोंदवावी लागणार आहे. परंतु एखाद्या शाळेच्या ठिकाणी दिवसभर रेंज नसल्यास हजेरी कशी आणि केव्हा नोंदवावी, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या प्रस्तावाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी झाल्यावरच या मोबाईल हजेरीच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित होणार आहे. सोमवारचा सेल्फी गुलदस्त्यात विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शिक्षकांनी महिन्याच्या पहिल्या सोमवारी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी फोटो घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. जानेवारीच्या पहिल्या सोमवारीच त्याची अंमलबजावणी सुरू होणे अपेक्षित आहे. परंतु आॅक्टोबर महिन्यातील या आदेशावर शिक्षकांनी रान उठविले होते. त्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. शिक्षण विभाग आणि शिक्षक या मुद्यावर गप्प आहे. आदेशानुसार सोमवारी २ जानेवारीला शिक्षक विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढणार का, हा मुद्दा सध्या गुलदस्त्यात आहे.