लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थ्यांनी गणवेशाच्या ४०० रुपयांसाठी उघडलेल्या बँक खात्यालाही ‘मिनिमम बॅलेन्स’ ठेवण्याची अट लावण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे कात्रण घेऊन पाचवी-सातवीच्या विद्यार्थ्यांनी थेट बँकेतच धडक देऊन अधिकाºयांना जाब विचारला. आमच्या खात्यातून कोणताही दंड न कापता विड्रॉल द्या, अशी मागणी केली. चिमुकल्यांच्या मागणीपुढे अखेर बँक अधिकारीही नमले आणि सर्वच विद्यार्थ्यांना गणवेशाची संपूर्ण रक्कम विड्रॉल करून दिली.मोफत गणवेशाऐवजी यंदा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ४०० रुपये जमा केले जात आहेत. मात्र, बँकांनी किमान जमा रक्कम खात्यात ठेवणे बंधनकारक केले. ‘मिनिमम बॅलेन्स’ विद्यार्थ्यांनी मेन्टेन न केल्यामुळे ५० ते १०० रुपयांचा दंड लावला.याबाबत ‘लोकमत’ने १७ सप्टेंबर रोजी ‘गणवेशाच्या खात्याला बँक दंडाचा घोर’ हे वृत्त प्रकाशित केले. शुक्रवारी त्याच वृत्ताचा आधार घेत आणि कात्रण सोबत घेऊन केळझरा वरठी (ता. आर्णी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट सावळी येथील बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा गाठली. श्रद्धा धोंगडे, दीप्ती मादेशवार, आचल खरतडे, कीर्ती धोंगडे, मृणाली लिंगायत, रचना भगत, चैताली धोंगडे आदी विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने बँक अधिकाºयांची भेट घेतली. झिरो बॅलेन्सवरच आमचे खाते ठेवा आणि आमच्या गणवेशाचे पूर्ण ४०० रुपये दंड न लावता विड्रॉल करावे, अशी मागणी केली. ‘लोकमत’च्या वृत्ताचा हवाला दिल्यानंतर कर्मचाºयांनीही नमते घेत सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण विड्रॉल दिला.हाच नियम राज्याला लावा!विद्यार्थ्यांचा हट्ट पाहून सावळीच्या बँकेने त्यांना पूर्ण गणवेशाची रक्कम दंड कपात न करता दिली. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी बँकेला आभारपत्रही दिले. मात्र, आता हाच नियम लावून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सर्व बँकांनी दंड कपात न करता गणवेशाचा पूर्ण निधी विड्रॉल करू द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांनी मिळविला ‘झिरो बॅलेन्स’चा फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:47 PM
विद्यार्थ्यांनी गणवेशाच्या ४०० रुपयांसाठी उघडलेल्या बँक खात्यालाही ‘मिनिमम बॅलेन्स’ ठेवण्याची अट लावण्यात आली होती. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे कात्रण घेऊन .....
ठळक मुद्देबँकेवर धडक : गणवेशाच्या खात्याला ‘मिनिमम बॅलन्स’ची अट झुगारली