आॅनलाईन लोकमतयवतमाळ : परीक्षा तोंडावर येऊनही शिक्षण शुल्क न मिळाल्याने समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी बोलून शुल्क मिळवून द्यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या (टीआयएसएस) राज्यासह देशातील सर्व शाखांमध्ये शिकणाºया ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबतचा शासन वाटा शासनाने सतत प्रलंबित ठेवला. त्यामुळे टीआयएसएसच्या व्यवस्थापन मंडळाने सदर शुल्काची मागणी केली आहे. परंतु, विद्यार्थी पैसे भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी संपर्क साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सामाजिक विद्याशाखांमधील संशोधन, शिक्षण यास तंत्रज्ञानाच्या युगाम दुय्यम स्थान आलेले आहे. जागतिक पातळीवर नावाजलेल्या टीआयएसएस सारख्या नामवंत संस्थेला शासनाच्या उदासीन धोरणांमुळे संशोधनविषयक ३५ ज्ञानशाखा बंद कराव्या लागत असतील तर हे समाजाचे मोठे नुकसान आहे, असे निवेदनात म्हटले आहे. परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क न मिळाल्याने आंदोलनात उतरावे लागले आहे. आठवडाभरापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून अजूनही शासकीय प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच यात तोडगा काढवा, अशी मागणी करणारे निवेदन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना सुपूर्द केले आहे.
परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 10:56 PM
परीक्षा तोंडावर येऊनही शिक्षण शुल्क न मिळाल्याने समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी बोलून शुल्क मिळवून द्यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
ठळक मुद्देशिक्षण शुल्क अडले : मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे मध्यस्थी करण्याची मागणी