शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
3
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
4
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
5
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
6
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
8
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
9
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
10
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
11
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
12
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
13
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
14
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
15
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
16
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
17
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
18
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
19
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
20
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?

पाण्यासाठी थांबली पळापळ, ७९ हजार शाळांत लागला नळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:10 AM

अमरावती, भंडाऱ्याने मारला पहिला नंबर : प्रजासत्ताकदिनी शंभर टक्के यशासाठी ‘जलजीवन’चा ग्रामसभेत आढावा

अविनाश साबापुरे

यवतमाळ : महाराष्ट्रातील एक लाख नऊ हजार शाळांपैकी तब्बल ८५ हजार ३१७ शाळा ग्रामीण भागात आहेत. या शाळांमध्ये वर्षानुवर्षे पाणीपुरवठ्याची समस्या होती; परंतु जिल्हा परिषदांद्वारे सुरू केलेल्या जलजीवन मिशनमुळे तब्बल ९२.८७ टक्के शाळा पाणीदार झाल्या असून, ७९ हजार २३७ शाळांमध्ये नळ लागला आहे. आता हे यश पुढील वर्षापर्यंत १०० टक्क्यांवर नेण्याचा संकल्प मानस मिशनच्या प्रकल्प संचालक सुषमा सातपुते यांनी केला आहे.

१५ ऑगस्ट २०१९ पासून या मिशन अंतर्गत ‘हर घर नल से जल’ मोहीम सुरू झाली. त्यातच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतींमध्येही नळ बसविण्याचे टार्गेट जिल्हा परिषदांना देण्यात आले होते. शाळांमध्ये नळ बसविण्यात अमरावती, भंडारासह आठ जिल्ह्यांनी शंभर टक्के यश मिळविले आहे,उर्वरित बहुतांश जिल्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक शाळांमध्ये नळ पोहोचविण्यात आला; परंतु अजूनही गडचिरोली, पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये हे यश जेमतेम ५० टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांवर फोकस करण्याचे निर्देश प्रकल्प संचालकांनी २० जानेवारीला पाठविलेल्या पत्रात दिले आहेत. आता प्रजासत्ताकदिनी प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन शंभर टक्के घरे व शाळांपर्यंत नळ पोहोचविण्याबाबत आढावा घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

शंभर टक्के शाळेत नळ असलेले जिल्हे

*जिल्हा - एकूण शाळा - नळ बसविलेल्या शाळा*

  • अमरावती - २३४३ - २३४३
  • भंडारा - ११५७ - ११५७
  • जळगाव - २६७४ - २६७४
  • कोल्हापूर - ३०९९ - ३०९९
  • परभणी - १५०९ - १५०९
  • सांगली - २३८८ - २३८८
  • वर्धा - ११९६ - ११९६
  • वाशिम - ११५७ - ११५७

९० टक्क्यांपेक्षा अधिक शाळेत नळ लावणारे जिल्हे

*जिल्हा - एकूण शाळा - नळ बसविलेल्या शाळा*

  • बुलडाणा - २०८५ - २०८१
  • सातारा - ३५२४ - ३४९७
  • अहमदनगर - ४७८० - ४७४०
  • यवतमाळ - २७४८ - २७२२
  • धुळे - १६२८ - १६०९
  • औरंगाबाद - ३२९२ - ३२४५
  • सोलापूर - ३९१६ - ३८३१
  • हिंगोली - ११४० - १११२
  • रायगड - ३२२८ - ३११६
  • सिंधुदुर्ग - १५९८ - १५३८
  • नांदेड - ३३८१ - ३२४६
  • नाशिक  - ४५७४ - ४३७८
  • रत्नागिरी - ३१४९ - ३०१३
  • अकोला - १३९८ - १३२९
  • लातूर - २००१ - १८८१
  • चंद्रपूर - १८६१ - १८२१
  • जालना - २०११ - १८१३

८० टक्क्यांपेक्षा अधिक शाळेत नळ लावणारे जिल्हे

*जिल्हा - एकूण शाळा - नळ बसविलेल्या शाळा*

  • नागपूर - २४६७ - २२१८
  • उस्मानाबाद - १८४३ - १६३६
  • बीड - ३३४९ - २९५२
  • पुणे - ५५५१ - ४७९५
  • गोंदिया - १६६४ - १३९९
  • ठाणे - १६५० - १३५१

सर्वात कमी काम झालेले जिल्हे

*जिल्हा - एकूण शाळा - नळ बसविलेल्या शाळा*

  • नंदूरबार - १८८० - १५०२
  • पालघर - ३१३७ - २११४
  • गडचिरोली - १८३९ - ७७५

शाळेत असा होतोय नळाचा वापर

महाराष्ट्रातील ६३ हजार १३ शाळांमधील शौचालय व मूत्रीघरात नळ वापरला जातो. ७३ हजार ८२१ शाळेत हॅन्डवॉश स्टेशनसाठी नळ बसविला आहे. तर २३ हजार ८४३ शाळांमध्ये नळाद्वारेच बागेसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर होतो. मात्र, रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केवळ सहा हजार १४७ शाळांमध्येच करण्यात आली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाWaterपाणी