लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सन १९९३ च्या बॅचच्या वर्गमित्रमैत्रिणींनी तब्बल २६ वर्षांनी एकत्र येत स्रेहमिलन सोहळा साजरा केला. स्थानिक सुराणा भवनमध्ये हा सोहळा घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरूवात स्थानिक मित्रांनी पंजाबी ढोलवर नाचत बाहेरगावावरून आलेल्यांचे स्वागत केले. तसेच जि.प.शाळेला भेट देत एक पिरेडही घेण्यात आला. यावेळी आनंदवन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ब्रम्हदत्त पांडेय यांनी शाळेतील प्रसंगांना अधोरेखीत केले. यावेळी शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. त्यात लिला बुरांडे, अंजली बडवे, चंदा परचाके, गायकवाड, कुमरे, शरद मद्दलवार, भास्कर डंभारे, सुरेश ठाकरे, संतोष बोळकुंटवार, गणेश राजगुरे, प्रा.डॉ.ब्रम्हदत्त पांडेय आदींचा समावेश आहे. दुसऱ्या सत्रात केळापूर येथे सहल नेण्यात आली. सहकारी मित्र अनिल बोरेले यांनी उभारलेल्या वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांना काही वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी प्रा.डॉ.लिला भेले यांनी संवाद साधला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रितेश परचाके यांनी केले. संचालन उज्वल आडे व भावना दर्शनवार यांनी केले, तर आभार सपना बाजोरीया यांनी मानले. परीमल, दिपाली मधुपवार, भावना सोनटक्के यांनी मनोगत व्यक्त केले. भावना दर्शनवार, श्रृती उपलेंचवार यांनी गीत गायीले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष सेंगर, योगेश मुस्तीलवार, कीरण पुरोहित, आशिष कापर्तीवार, राहुल कोमावार, मनोज झंवर, अनिल बोरेले, श्रीकांत सपाट, प्रमोद पंड्या, अभय पुल्लजवार, लिना सिडाम, मनिषा बंदे, भावना कोठेकर यांनी सहकार्य केले.
पांढरकवडाचे विद्यार्थीमित्र आले २६ वर्षांनी एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 10:00 PM