लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली. टाकळी सलामी गावातील नागरिकांना हक्काचे लिजपट्टे मिळाले. ६५ लाभार्थ्यांना ते राहात असलेल्या जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.१९९५ व त्या पूर्वीपासून या गावातील ६५च्या वर कुटुंब महसूल विभागाच्या जागेवर राहत होते. प्रशासनाने गावातील ९७ लोकांच्या जागेची मोजणी करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यातील ६५ कुटुंब निकषात बसले. मात्र शासन, प्रशासनाने डोळेझाक केल्याने नागरिक त्रस्त झाले होते. ना. संजय राठोड या भागाचे पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून टाकळी सलामी येथील या नागरिकांना लिजपट्टे देण्याबाबत त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. जागेच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र देण्याची ग्वाही गावकºयांना दिली. महसूल राज्यमंत्री म्हणून त्यांनी पूर्वीचा प्रस्ताव पुन्हा शासनस्तरावर मार्गी लावला व टाकळी सलामी येथील नागरिकांना लिज पट्टे देण्याचा निर्णय घेतला.गावकºयांना त्यांच्या गावात जावून ना. संजय राठोड यांनी प्रमाणपत्र वितरित केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत मसराम, पंचायत समिती सदस्य भीमराव खोब्रागडे, टाकळी सलामीच्या सरपंच चौधरी, तहसीलदार अमोल पोवार, नायब तहसीलदार चिंतकुंटलवार, गटविकास अधिकारी युवराज मेत्रे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख दीपक आडे, रविकिरण राठोड, प्रवीण रोठोड, गुड्डू देशमुख, इंद्रजित चव्हाण आदी उपस्थित होते.
टाकळीतील नागरिकांच्या २५ वर्षांच्या लढ्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 9:55 PM
तालुक्याच्या टाकळी सलामीचे नागरिक गत अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची आतूरतेने प्रतीक्षा करीत होते, तो क्षण महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या परिश्रमानंतर त्यांच्या वाट्याला आला. हक्काच्या जागेसाठी चाललेली गावकऱ्यांची लढाई अखेर संपुष्टात आली.
ठळक मुद्देहक्काची जागा मिळाली : संजय राठोड यांच्या हस्ते लिजपट्टे प्रमाणपत्र वितरण