लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीच्या निकालात (सीबीएसई) यंदाही गुण फुगवट्याची चर्चा होत आहे. त्यात शाळेइतकाच शिकवणीवर्गाचाही वाटा आहे. पण यवतमाळातील एका विद्यार्थ्याने चक्क शिकवणी वर्ग न लावताही दहावी उत्तीर्ण केली. तीही ९५ टक्के गुणांसह!हर्ष चंद्रशेखर खसाळे असे या गुणवंताचे नाव आहे. येथील यवतमाळ पब्लिक स्कूलचा (वायपीएस) तो विद्यार्थी आहे. शालेय अभ्यासक्रम लक्षपूर्वक पूर्ण करण्यावर हर्षचा नेहमीच भर असतो. हल्ली शिकवणी वर्गाचे स्तोम माजले आहे. त्यातच दहावी म्हटले तर शिकवणी वर्गाविना यश मिळणारच नाही, असा भ्रम बहुतांश पालकांच्या मनात पक्का झाला आहे. परंतु, हर्ष खसाळे याने सुरूवातीलाच खासगी शिकवणी वर्ग न लावण्याचा निश्चय केला. यासाठी त्याला आईवडीलांनीही पाठबळ दिले.तरीही हर्ष चंद्रशेखर खसाळे या विद्यार्थ्याने उत्तम यश मिळविले. यात त्याची मेहनत आणि शाळेतील शिक्षकांचे परिश्रम कारणीभूत ठरले. हर्ष आपल्या यशाचे गुपित सांगताना म्हणाला, शाळेत मी प्रत्येक विषय लक्षपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. घरी आल्यावर तेच पुन्हा वाचून काढले. ज्या अडचणी आल्या त्या एका कागदावर लिहून काढल्या. कुठलीही अडचण आली तर दुर्लक्ष केले नाही. तर त्या अडचणी शाळेतील शिक्षकांना विचारल्या. त्यांनीही तत्परतेने मार्गदर्शन केले. त्यामुळे मला कधीही खासगी शिकवणी लावण्याची गरजही वाटली नाही. शाळेतील शिक्षक आपल्या अडचणी सोडविण्यासाठी तयार असतातच.लोकांना वाटले नवलदहावीचा निकाल आल्यावर हर्ष खसाळे जेव्हा लोकांकडे पेढे घेऊन गेला, तेव्हा अनेकांना नवल वाटले. हर्ष सांगतो, प्रत्येक घरी गेल्यावर मला एकच प्रश्न विचारण्यात आला, ट्यूशन कुठे लावली होती? मी जेव्हा सांगायचे की ट्यूशन लावलीच नव्हती, तर ते माझ्याकडे अविश्वासाने बघायचे. दहावीत शिकवणी न लावणे ही सध्याच्या काळात अनेकांना ‘रिस्क’ वाटते. माझ्या आईबाबांनी मला त्यासाठी प्रोत्साहन दिले. शाळेच्या शिक्षकांनी पाठबळ दिले.
‘वायपीएस’च्या हर्षचे शिकवणीविना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:06 PM
दहावीच्या निकालात (सीबीएसई) यंदाही गुण फुगवट्याची चर्चा होत आहे. त्यात शाळेइतकाच शिकवणीवर्गाचाही वाटा आहे. पण यवतमाळातील एका विद्यार्थ्याने चक्क शिकवणी वर्ग न लावताही दहावी उत्तीर्ण केली. तीही ९५ टक्के गुणांसह!
ठळक मुद्देदहावीत ९५ टक्के : शालेय अभ्यासक्रमावर भर