शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

व्यापाऱ्यांचा बंद जिल्हाभर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 9:20 PM

रिटेल व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याच्या विरोधात शुक्रवारी व्यापाºयांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी झाला.

ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसाद : विदेशी गुंतवणुकीला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रिटेल व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिल्याच्या विरोधात शुक्रवारी व्यापाऱ्यांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला यवतमाळ शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने बंद यशस्वी झाला.चिल्लर व्यापारातही आता परकीय गुंतवणुकीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाºयांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक वर्षापासून परंपरागत व्यापार करणारा मोठा वर्ग यामुळे अडचणीत येणार आहे. शिवाय जीएसटी कर प्रणालीच्या धक्क्यातून व्यापारी बाहेर येण्यापूर्वीच त्याला आता दुसरा धक्का शासन देत आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात संपूर्ण देशात व्यापार बंद पुकारण्यात आला होेता. यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. व्यापारी संघटनेच्या बंद येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यवतमाळच्या तिरंगा चौकात व्यापारीवर्गांनी सरकारच्या धोरणाचा जाहीर निषेध केला.संरक्षित कर, त्यावर दंड ही तरतूद रद्द करावी, व्यापारासंदर्भात कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात असताना व्यापाºयांना विश्वासात घ्यावे, यामुळे व्यापारी व शासनामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. भारतीय व्यापाºयांना तसेच येथील अर्थव्यवस्थेला विदेशी कुबड्यांची गरज नाही, केवळ योग्य मार्गदर्शन व धोरण राबविणे आवश्यक आहे, अशी मागणी व्यापाºयांनी निवेदनातून केली.यावेळी यवतमाळ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरूणभाई पोबारू, सचिव प्रशांत बनगिनवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. वणीपासून उमरखेडपर्यंत ग्रामीण भागात सर्वत्र बंद यशस्वी झाला. शिष्टमंडळात उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, सहसचिव महेश करवा, गणेश गुप्ता, सदस्य कमल बागडी, उपाध्यक्ष मधुसुदन मुंधडा, कोषाध्यक्ष संजय सूचक, सदस्य मधुसुदन केडिया, शशांक देशमुख आदी सहभागी होते.‘एक देश एक कर’ संकल्पना थंडबस्त्यातकर आकरणीसाठी लागू केलेली नवीन प्रणाली सर्वसामान्य व्यापाºयांच्या आकलन शक्ती बाहेर आहे. ही प्रक्रिया सरळ व सूटसुटीत करावी, जेणे करून व्यापाºयांना सहज कराचा भरणा करता येईल. एक देश - एक कर या संकल्पनेची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही.

टॅग्स :Investmentगुंतवणूक