शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

कृष्णेच्या तीरी साखर विरघळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:06 PM

राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.

ठळक मुद्देराज्यभरात साखरेचे दर कडाडले सण उत्सवाच्या तोंडावर महागाईचे संकट

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने कोल्हापूर, सांगली आणि कराडला मोठा फटका बसला. या ठिकाणावरून राज्यभरात साखर आणि गुळ पोहचविला जातो. परंतु, पुरामुळे मोठ्या प्रमाणात साखर आणि गुळाचे पाणी झाले. यातून राज्यात साखरेसोबत गुळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी साखर व गुळाचे दर कडाडले आहेत.गतवर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. यामुळे साखरेची निर्यात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. यानंतरही पुरेशा प्रमाणात निर्यात झाली नाही. अखेरीस साखरेचा कोटा राज्यातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायम राहिला. साखर कारखान्यातील साखर ठोक विक्रेत्यांकडे जाते. त्यातून चिल्लर विक्रेते साखरेची खरेदी करतात. त्यानंतर ती इतर दुकानामध्ये पोहचते. साखर मुबलक प्रमाणात असल्याने वर्षभरापासून साखरेचे दर स्थिर होते.आणखी वर्षभर ही स्थिती कायम राहणार असल्याची शक्यता होती. मात्र कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीला आलेल्या पुराने साखर आणि गुळ साठ्याचे संपूर्ण गणितच बिघडविले आहे. कोल्हापूर, सांगली आणि कराडमधील साखर आणि गुळाच्या ठोक विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. पुराचे पाणी गोदामामध्ये शिरले. साखर आणि गुळाचे पाणी झाले. हे नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, त्यातून तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे.यामुळे राज्यभरात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी ३३ ते ३४ रूपये किलो असलेली साखर ३६ रूपयांवर पोहोचली आहे. तर गुळाचे दर ३६ ते ३८ रूपये किलोवरून ४२ ते ४३ रूपये किलोवर पोहचले आहेत. पुढे हे दर आणखी वाढतील, असा अंदाज व्यापारी वर्तवित आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून साखरेचा आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात उठाव वाढला आहे. गत १५ दिवसांपासून राज्यात होणारा साखरेचा पुरवठाही थांबला आहे. यातून साखरेचा आणि गुळाचा गोडवा सण उत्सवात कडू होण्याचा धोका आहे.

ऐन सण उत्सवातच झळसण उत्सवाला सुरूवात होतानाच साखर आणि गुळाचे मोठे संकट उभे झाले आहे. यामुळे येणाºया काळात पोळा, गणपती, गौरीपूजन, दसरा आणि दिवाळीच्या सणात नागरिकांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. यातून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

ऊसाचे केवळ १० टक्के क्षेत्रयावर्षी मराठवाड्यात पाऊस पडलाच नाही. यामुळे या पट्ट्यातील ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या १० टक्के क्षेत्रातच ही लागवड नोंदविली गेली आहे. ९० टक्के क्षेत्र इतर पिकाच्या लागवडीखाली आले आहे. यामुळे येणाºया काळात उत्पादनावर परिणाम होणार आहे.पूरपरिस्थितीमुळे साखरेचा कोटा घटला. परंतु यावर्षी ऊसाची लागवड न झाल्याने पुढच्या वर्षी आणखी गंभीर स्थिती निर्माण होण्याची व दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.- दत्तात्रय गायकवाड, उपायुक्त (साखर), पुणेपुरामुळे साखर उत्पादक जिल्ह्यात ४० टक्के साखरेचे नुकसान झाले आहे. यावेळी १९ लाख क्विंटल साखर पाठविण्यात आली. यामध्ये दोन लाख क्विंटलची तफावत आहे. यामुळे दीड वर्षांपासून स्थिर असलेली साखर क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढली आहे.- रोहित सिंघानिया, साखरेचे ठोक विक्रेता, यवतमाळ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने