शेख साबुद्दीन शेख लाल असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. शेख साबुद्दीन शेख लाल यांनी बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच, त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे; परंतु सततच्या नापिकीमुळे शेती व्यवसाय परवडत नसल्यामुळे शेती ठेक्याने देत होते. तसेच मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अशातच त्यांनी काही कामानिमित्त मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्जाची उचल केली होती; परंतु या कर्जाच्या हप्त्यासाठी या मायक्रो फायनान्स कंपनीकडून त्यांना सतत तगादा लावल्या जात होता. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.
मायक्रो फायनान्सच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 4:52 AM