आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विविध कारणांमुळे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी महिलेसह दोन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली. घाटंजी तालुक्याच्या देवधरी व कळंब तालुक्यातील देवनाळा येथे या घटना घडल्या.देवधरी येथील सविता राजू श्रीरामजवार (३०) या शेतकरी महिलेने बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास विषारी औषध घेतले.ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तिच्योकडे तीन एकर शेती आहे. त्यावर सोसायटीचे ४५ हजार रुपये आणि खासगी कर्ज आहे. काही वर्षांपासूनची नापिकी आणि यावेळी बोंडअळीचे आक्रमण झाल्याने कर्ज वाढतच असल्याच्या चिंतेतून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मागे दोन मुले व मोठा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पारवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.कळंब तालुक्याच्या देवनाळा येथील अल्पभूधारक शेतकरी देवीदास पवार याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याने सोमवारी रात्री स्वत:च्या शेतात विष घेतले. त्याच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यावर बँकेचे ४० हजार कर्ज आहे. कपाशीवर बोंडअळी आल्याने यावेळी उत्पादन घटले. या स्थितीत कर्जाची परतफेड करायची कशी या विवंचनेतच त्याने आत्महत्या केली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी महिलेसह दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:13 AM
विविध कारणांमुळे यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकरी महिलेसह दोन जणांनी आपली जीवनयात्रा संपविली.
ठळक मुद्दे४० - ४५ हजारांचे कर्ज