मृतकाला थापडा मारने पडले संतोश गवळेला महागात.
फोटो पासपाेर्ट
ढाणकी : मन्याळी येथे गुरुवारी सकाळी ८ वाजता क्षुल्लक वादातून एका युवकाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बाळू यशवंता काळबांडे (३२, रा. मन्याळी) असे मृताचे नाव आहे. बाळू ऑटोरिक्षा चालवित होता. दोन वर्षांपासून तो मन्याळी येथील दूध उत्पादक सोसायटीचे संकलित झालेले दूध कृष्णापूर फाटा येथील दूध डेअरीत पोहोचवीत होता. गुरुवारी बाळूने संस्थेचे दूध ढाणकी येथे पोहोचविण्यासाठी आपला ऑटो संस्थेच्या दारात लावला. तेथे संतोष रामदास गवळे व त्याचा भाऊ ज्ञानेश्वर गवळे यांनी त्याला दूध वाहतूक करण्यास मज्जाव केला. त्यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
संतोष आणि ज्ञानेश्वरने बाळूला भर चौकात आणि सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याची तक्रार मृताची पत्नी अर्चना काळबांडे (३०) यांनी बिटरगाव ठाण्यात केली. मारहाणीचे शल्य सहन न झाल्याने बाळूने घरी येऊन कीटकनाशक प्राशन केले. पत्नी अर्चना चहा घेऊन त्याच्या खोलीत गेली असता बाळूची घालमेल दिसली. लगेच बाळूला ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही वार्ता परिसरात पसरली व दवाखान्यात गर्दी जमली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविल्याचे सांगितले.
080721\img-20210708-wa0029.jpg
मृतक - बाळू काळबांडे