लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणच्या कंत्राटदारांची देयकेच मिळाली नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली आहे. याबाबत त्यांनी अधीक्षक अभियंता यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केल्यानंतर बुधवारपासून महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर साखळी उपोषण आरंभिले आहे.एप्रिल २०१७ पासून कामाचे देयके कंत्राटदारांनी सादर केले आहे. मंजूर देयकेही अद्याप अप्राप्त आहे. मार्च २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतचे कृषिपंप विद्युत कनेक्शनचे देयकेही अप्राप्त आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कृषिपंप जोडण्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने महावितरणने मार्च २०१२ पासून प्रलंबित कृषिपंप विद्युत जोडण्यांसाठी सलग दोन वर्षे निविदा काढल्या. त्याअंतर्गत कंत्राटदारांनी कामे घेवून ती युद्धपातळीवर पूर्ण केली. मार्च २०१६ पर्यंत प्रलंबित तब्बल १७ हजार २०० कृषिपंप जोडण्या पूर्ण करण्यात आल्या. परंतु त्यानंतरही महावितरणने कंत्राटदारांच्या समस्येची दखल घेतली नाही आणि त्यांची देयके दिली नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कंत्राटदारांच्या मागे साहित्यपुरवठादार, मजूरवर्ग, वाहतूकदार व वित्त पुरवठादार यांनी पैशाचा तगादा लावला असून वीज कंत्राटदार सध्या त्रस्त आहे.उपोषण आंदोलनात अतुल पाटील, नीलेश काळे, मनोज गाढवे, राम कदम, प्रमोद डंबोले, पंकज ढेंबरे, गजेंद्र काकडे, रवींद्र फाळके, अतुल आसरकर, रवींद्र पवार, सचिन बिलोरिया, विजय नेसनतकर, प्रवीण किटे, अतुल अ. पाटील, सतीश ठाकरे, फारूक हुसेन, आकाश ढवळे, संजय शिरभाते, जाकीर हुसेन सुबेदार, संतोष इटकरे, रमेश बाभूळकर, राजू पवार, मनोज नवदुर्गे, प्रवीण हजारे, धीरज सोनटक्के आदी सहभागी झाले होते.
विद्युत कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:25 PM
गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणच्या कंत्राटदारांची देयकेच मिळाली नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली आहे.
ठळक मुद्देदेयके थकली : महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण आंदोलन