शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची पाठराखण

By admin | Published: September 19, 2015 2:27 AM

पंचायत समितीतील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून पाठराखण केली जात आहे. तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायतराज समितीकडे या संबंधाची तक्रार महाराष्ट्र माहिती ...

किनवट : पंचायत समितीतील भ्रष्ट पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडून पाठराखण केली जात आहे. तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायतराज समितीकडे या संबंधाची तक्रार महाराष्ट्र माहिती अधिकार तपास समितीने केली. त्यावेळी उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी कारवाईचे आश्वासन दिले.किनवट तालुक्यातील वझरा बु. ग्रामपंचायती अंतर्गत विविध योजनांमध्ये गैरप्रकार होत आहे. याची दखल घेऊन भ्रष्ट ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, अभियंता व अन्य संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या बाबत जनतेची ओरड असतानाही कारवाई केली जात नाही, असे महाराष्ट्र माहिती अधिकार तपास समितीचे तालुकाध्यक्ष अमोल शेंद्रे यांनी म्हटले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेंद्रे यांनी पंचायतराज समितीकडे तक्रार दाखल केली. त्यावेळी आमदार राजेंद्र नजरधने यांनी कारवाईचे आश्वासन दिले. वझरा ही ग्रामपंचायत १० वर्षापासून अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे. येथील माजी सरपंच जयमाला मेश्राम यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन उपसरपंच, ग्रामसेवक, अभियंता, विस्तार अधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून गैरप्रकार केला. स्वजलधारा पाणीपुरवठा, ठक्करबाप्पा, दलित वस्ती, शिवकालिन बंधारा, तेरावा वित्त आयोग, विशेष घटक योजना अशा अनेक योजनांमध्ये अपहार करण्यात आला व कामे कागदोपत्री दाखविण्यात आली. आदिवासी लोकांच्या विकासाला यामुळे खीळ बसली आहे. सुमारे ११०० लोकसंख्या असलेल्या गावातील भ्रष्ट पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दोन वर्ष का लागावी, अशी शंका तक्रारीत उपस्थित करण्यात आली आहे. पंचायतराज समितीतील आमदार नजरधने यांनी तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा शेंद्रे यांनी व्यक्त केली.