लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोमवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील मुख्याध्यापकाने शिक्षकांचे मुंडण करून पाठींबा दर्शविला आहे.जुन्या पेन्शन हक्क संघटनेने जुन्याच पेन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर धडक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ नोव्हेंबर २00५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेले सर्व कर्मचारी सोमवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे. त्यांच्या या न्याय मागणीला दारव्हा तालुक्यातील मुख्याध्यापक गिरीधर ससनकर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने पाठींबा दर्शविला आहे.ससनकर यांनी आपल्या मूळ गावी राळेगाव येथे रविवारी तालुक्यातील अनेक शिक्षकांचे मोफत मुंडण करून दिले. यासोबतच त्यांनी या लढ्यात सहभागी अनेक कर्मचाºयांचेही मोफत मुंडण करून दिले. या वेगळ्या पद्धतीने त्यांनी पेन्शन लढ्याला सक्रिया पाठींबा दर्शविला आहे.
शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मुंडण करून पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 10:18 PM
जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोमवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील मुख्याध्यापकाने शिक्षकांचे मुंडण करून पाठींबा दर्शविला आहे.
ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोमवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा नेला जाणार आहे.