शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
3
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
4
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
5
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
7
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
8
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
9
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
10
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
11
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
12
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
13
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
14
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
15
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
16
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
17
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
18
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
19
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी
20
शेकडो कर्मचाऱ्यांसाठी रतन टाटा बनले संकटमोचक; नोकरीवरुन काढण्याची नोटीस घेतली मागे

ईदच्या खर्चात ‘सहेरी’ला सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 5:00 AM

विशेषत: मुस्लीम समाजात असे कुटुंब मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. या बांधवांच्या अत्यंत पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली. या महिन्यात मुस्लीम बांधवा ‘रोजा’ ठेवत आहे. हा उपवास गोड पदार्थ खाऊन सोडला जातो. परंतु हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांजवळ दोन वेळचे पोट भरायलाही पैसे नाही. त्यात गोड पदार्थ कोठून आणणार, असा प्रश्न आहे.

ठळक मुद्देयुवकांचा पुढाकार : दारव्हा येथे ७00 कुटुंबांना ३0 दिवस फळांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : रमजान महिन्यातील ‘सहेरी’ अर्थात उपवास सोडण्यासाठी ७00 गरजू मुस्लीम कुटुंबांना ३0 दिवस फळे, भाजीपाला पुरविण्याचा विडा येथील काही युवकांनी उचलला. ईदसाठी खर्च करण्याऐवजी त्यातून वाचणाऱ्या पैशातून ही मदत केली जात आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागु आहे. १७ मे पर्यंत त्यात वाढ झाली. सर्व कामकाज बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. विशेषत: मुस्लीम समाजात असे कुटुंब मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. या बांधवांच्या अत्यंत पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली. या महिन्यात मुस्लीम बांधवा ‘रोजा’ ठेवत आहे. हा उपवास गोड पदार्थ खाऊन सोडला जातो. परंतु हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांजवळ दोन वेळचे पोट भरायलाही पैसे नाही. त्यात गोड पदार्थ कोठून आणणार, असा प्रश्न आहे.अशावेळी गरजुंच्या मदतीला काही युवक धावून आले. रमजान महिन्यात पवित्र कार्य करावे, या उद्देशाने अशा कुटुंबांना मदत देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यासाठी यावर्षी ईद उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करायचा, स्वत: अथवा कुटुंबासाठी नवीन कपडे व इतर साहित्य खरेदी न करता त्यातून वाचणाºया पैशातून मदत करण्याची संकल्पना पुढे आली. सर्व युवकांनी लगेच पैसे गोळा केले आणि रमजान महिन्याच्या पहिल्या दिवसापासून या उपक्रमाला सुरुवात केली. या निधीतून दरदिवशी ७00 कुटुंबांना फळे, भाजीपाल्याचे वाटप केले जात आहे.या उपक्रमासाठी समीर शेख, सय्यद रेहान, इमरान खान, अनिक शेख, शाहीद शेख, अजहर मिर्जा, मुजम्मिल कुरैशी, वाजीद शेख, मौलवी फैज, मतीन सोलंकी, सय्यद अथर, मतीन शेख आदी पुढाकार घेत आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्वधर्म समभावहा उपक्रम केवळ मुस्लीमच नव्हे, तर सर्व समाजातील गरीब, गरजू बांधवांसाठी राबविला जात आहे. फळे, भाजीपाला घेतल्यानंतर स्वच्छ करून पिशवीत पॅक केला जातो. दुपारी १.३0 ते ४ या वेळेत गरजुंपर्यंत पोहोचविला जातो. या युवकांनी गरजुंना मदत करण्यासोबतच या उपक्रमातून सर्वधर्म समभावाचा संदेशसुद्धा दिला आहे.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईद