शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साहित्य नसल्याने शस्त्रक्रिया अडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 9:32 PM

जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सातत्याने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात. मागील काही दिवसापासून नेत्रशस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधी व साधन सामुग्री शासनस्तरावरून पुरविण्यात आली नाही.

ठळक मुद्देसंचालकांना साकडे : अंधत्व निवारण समितीचा पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सातत्याने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात. मागील काही दिवसापासून नेत्रशस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधी व साधन सामुग्री शासनस्तरावरून पुरविण्यात आली नाही. यामुळे नेत्र शस्त्रक्रिया रखडल्या आहे.नेत्रशस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या इंजेक्शन, सोलुलोज आणि पॅनल ब्लेडस उपलब्ध नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया करणेच थांबले आहे. यासाठी जिल्हा अंधत्व निवारण समितीच्या अध्यक्ष तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी सहसंचालक आरोग्यसेवा असंसर्गजन्य रोग यांना ३ एप्रिल रोजी पत्रव्यवहार केला. अजूनही औषधी व साहित्य उपलब्ध झालेले नाही. आयुर्वेदिक रुग्णालय यवतमाळ, उपजिल्हा रुग्णालय दारव्हा, उपजिल्हा रुग्णालय पुसद आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ या ठिकाणी सातत्याने अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो.शासनस्तरावरून औषधी पुरवठ्याबाबत दुर्लक्ष झाल्याने अंध गरीब रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत सहसंचालक स्तरावरून तातडीने काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी हे विकास कामे सांगण्यात व्यस्त आहे. प्रत्यक्ष औषधी पुरवठ्याची स्थिती मागील चार वर्षापासून अतिशय दयनीय आहे. केवळ राजकीय उद्देशासाठी रुग्णसेवेचा देखावा करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. अनेक आरोग्य शिबिराच्या आडून महागडी औषधी इतरत्र हलविण्यात आली. परिणामी नियोजन कोलमडले. आता गरजू व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांवरही शस्त्रक्रिया करता येत नाही. रुग्णांकडे आर्थिक तरतूद नसते. असली तरी स्थानिक डॉक्टर बाहेरून औषधी लिहून देवू शकत नाही. अशा कचाट्यात अंध रुग्ण अडकले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल