शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

जिल्हा कचेरीतील कच-यावर ‘सर्जिकल स्ट्राइक’

By admin | Published: May 04, 2017 6:41 PM

पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्याच प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याची

ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि.04 -  पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे मोल गावखेड्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ज्या जिल्हा प्रशासनाच्या खांद्यावर आहे, त्याच प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार असल्याची बाब गुरूवारी चव्हाट्यावर आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतींमध्ये धूळ आणि कच-याचा तर खच आहेच; पण सोबतीला दारूच्या बॉटलही विखुरलेल्या आहेत. लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’ स्टाईल सफाई आंदोलनाने नव्या को-या प्रशासकीय इमारतींमधली धूळ आणि सुस्तावलेल्या प्रशासनाची झोप उडविली. 
शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलनाची वाच्यता न करता लोकजागृती मंचचे शंभर-दीडशे कार्यकर्ते दुपारी एकच्या सुमारास जिल्हा कचेरी परिसरात शिरले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध विभागांची कार्यालये सुसज्ज प्रशासकीय इमारतींमध्ये आहेत. तब्बल पाच कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या या इमारतींच्या भोवती दारूच्या बाटल्यांचा खच कार्यकर्त्यांना आढळून आला. ठिकठिकाणी सापडणा-या या बाटल्या कार्यकर्त्यांनी गोळा केल्या.  
माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या नेतृत्वात सर्वांनी हाती झाडू घेऊन संपूर्ण परिसर साफ केला. विविध कार्यालयांमध्ये जाऊन कोपरान् कोपरा झाडून काढला. त्यावेळी सर्वत्र नुसते धुळीचे लोट उठत होते. जिल्हा कचेरीच्या भिंतींवर, जिन्यावर पान खाऊन पिचका-या मारलेल्या आहेत. कॉरिडॉर धुळीने माखलेला आहे. एकेका कार्यालयात लोकजागृती मंचचे कार्यकर्ते झाडू घेऊन शिरत होते, तेव्हा उपस्थित कर्मचारी मख्खपणे त्यांची सफाई पाहात होते. हे काय चाललेय, असे विचारण्याची तसदी एकाही कर्मचा-याने घेतली नाही. कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे नवी कोरी प्रशासकीय इमारत कचरा डेपो बनल्याचे दृश्य यावेळी समोर आले. 
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह  यांना नुकताच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासनातर्फे पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याच कार्यालयात स्वच्छ भारत मिशनची वाट लावली जात आहे. जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या पुरस्काराचा सन्मान राखायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गंधी, कचरा नसला पाहिजे. म्हणून आम्ही हे आंदोलन केले, असे लोकजागृती मंचचे देवानंद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. शनिवारी मुख्यमंत्री जिल्ह्यात येत आहेत. ते या अस्वच्छतेच्या प्रश्नावर काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी, तहसीलदार एखाद्या गावात गेले आणि तेथे अस्वच्छता आढळली की, ते गावक-यांना नोटीस देतात. आता जिल्हा कचेरीतील अस्वच्छतेबाबत कोण कुणाला नोटीस देणार, असा सवालही देवानंद पवार यांनी उपस्थित केला. 
या आंदोलनात लोकजागृती मंचचे देवानंद पवार यांच्यासह माजी सभापती शैलेश इंगोले, शालिकराव चवरडोल, हेमंत कांबळे, गोपाल चव्हाण, प्रदीप डंभारे, अजय डहाके, प्रवीण गुघाणे, मिथून अलाढे, अरविंद पाटील महल्ले, सुभाष नित आदी सहभागी झाले होते.
 
झाडू दिले प्रशासनाला भेट... 
संपूर्ण जिल्हा कचेरी परिसरात साफसफाई केल्यानंतर लोकजागृती मंचच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या कक्षाकडे मोर्चा वळविला. मात्र ते एका बैठकीला गेलेले होते. त्यावेळी आंदोलकांनी त्यांच्या कक्षाच्या बंद द्वारापुढे आपापले झाडू ठेवून दिले. आपले कार्यालय नियमित स्वच्छ करण्यासाठी आमच्यातर्फे ही सप्रेम भेट, असे उपस्थित कर्मचा-यांना सांगत लोकजागृती मंचचे कार्यकर्ते निघून गेले.