या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल इंग्रजी अभ्यासक्रमाचे धडे दिले जात आहे. कोविड १९ मुळे शाळा सुरू होणे लांबले होते. मात्र, मुलांची शैक्षणिक नियमितता तुटू न देण्याचे काम इंग्लिश ई-टीच वर्गात साध्य झाले आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळा अंजी येथे डायरेक्टर ऑफ सोशल सर्विस इन्स्टिट्यूटच्या आराधना उपाध्याय आणि डायरेक्टर ऑफ इंडियन पेस सेंटरचे कास्टा दीप यांनी भेट दिली. विकासगंगा संस्थेचे अध्यक्ष रंजीत बोबडे, मुख्याध्यापक नारायण भोयर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सरिता शुक्ला, राजू अनेवार, शिक्षक, पालक, अंगणवाडीसेविका व विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी डिजिटल अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन केले. आराधना उपाध्याय व कास्टा दीप यांनी मुलांसोबत इंग्रजी विषयावर संवाद साधला. मुलांनी इंग्रजीतूनच उत्तरे दिली.
बॉक्स
तीन वर्षांपासून प्रकल्प सुरू
कोरोना काळात शाळा जरी बंद असल्या, तरी इंग्लिश ई-टीच वर्ग नियमित सुरू होता. त्यामुळे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी कौतुक केले. ईईटी वर्गाविषयी पालकांनी आपल्या मुलांची इंग्रजी विषयातील गुणात्मक बदलाची सकारात्मक मांडणी केली. शाळा समन्वयक नीता सुरसकार यांनी तालुक्यात तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.