लोकमत न्यूज नेटवर्कबोरीअरब : हातगाव दीड हजार लोकवस्तीचं गाव. माहेरवासीनची गर्दी झाली. प्रत्येक माहेरवासीन आपल्यासोबत शिकत असलेल्या मैत्रिणीला शोधत होती. किती वर्षांनी भेटली गं? खुपच बदलली गं? मुलं बाळं किती? दे तुझा नंबर? अशा किती तरी गोष्टी करत माहेरवासीनींनी दारव्हा तालुक्यातील हातगाव येथे पुरण पोळीचा पाहुणचार घेतला आणि तृप्त मनाने आपल्या सासरी रवाना झाल्या.निमित्त होते पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेनिमित्त माहेरवासीनींच्या पाहुणचाराचे. दारव्हा तालुक्यातील हातगाव येथे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व विवाहित मुलींना सोहळ्याला बोलावून त्यांना साडी-चोळी देत पुरण पोळीचा पाहुणचार दिला. या अनुपम्य सोहळ्याने अनेकांची मने जिंकली. माहेरवासीनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली त्यावेळी कोणत्याही पालकाने दिवाळीला आपल्या मुलीला बोलाविले नाही. १५ नोव्हेंबरला कार्यक्रमाच्याच दिवशी येण्याचे ठरले. यासाठी आयोजकाने प्रत्येक माहेरवासीनीला संपर्क साधून कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या दिवशी एकुणएक माहेरवासीनी या सोहळ्यात उपस्थित झाल्या. ७० वर्षांच्या मोहरवासीनीही या सोहळ्यात दिसत होत्या. त्या गावात बालपण गेले, तेथे खेळल्या, तेथील मैत्रिणी एकत्र मिळणे कठीण. परंतु या सोहळ्याने सर्व मैत्रिणींना एकत्र आणले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जीवाभावाच्या मैत्रिणी इतक्या वर्षानंतर पाहुन अनेकींच्या डोळ्यात अश्रू तरळले. असा हा सोहळा अंत:करणात साठवून माहेरवासीनी पुन्हा सासरी निघाल्या तेव्हा एकमेकींच्या गळ्यात गळा टाकून अक्षरश: रडल्या.सोहळ्याला मान्यवरांची उपस्थितीमाहेरवासीनी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वृषाली राहुल ठाकरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महंत कमळकर बाबा (औरंगाबाद), महंत नेवास्कर बाबा (हातगाव), सरपंच उषाताई गिरी, शारदा चाराळे, छाया गिरी, दुर्गाताई आडे उपस्थित होते. वृषाली ठाकरे यांच्या हस्ते प्रत्येक माहेरवासीनीला साडी-चोळी देण्यात आली. यावेळी माहेरवासीनी सुधा रिठे, योगिता इंगोले, ज्योती गावंडे, कुसूम इंगोले, पूजा अवचार, सृष्टी अवचार यांनी मनोगत व्यक्त केले.
पुरणपोळीच्या पाहुणचाराने माहेरवाशिणी झाल्या तृप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:37 AM
हातगाव दीड हजार लोकवस्तीचं गाव. माहेरवासीनची गर्दी झाली. प्रत्येक माहेरवासीन आपल्यासोबत शिकत असलेल्या मैत्रिणीला शोधत होती.
ठळक मुद्देहातगाव येथे अनुपम सोहळा : पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला, जीवाभावाच्या मैत्रिणीला भेटताना कंठ दाटला